Ravindra Dhangekar Sarkarnama
पुणे

Kasba By Election : निकालाआधीच कसब्यात धंगेकर समर्थकांनी भाजपला डिवचलं; 'ही' कविता सोशल मीडियावर व्हायरल

Ravindra Dhangekar Vs Hemant Rasne: देशाचे नेते फिरवले गल्लीभर, धास्तीने जागेच रात्रभर...

सरकारनामा ब्यूरो

Pune News : कसबा, चिंचवड पोटनिवडणुक जाहीर झाल्यापासून पुण्यासह राज्यभरात चर्चेचा विषय ठरली आहे. आता या निवडणुकीची मतमोजणी उद्या (दि.२) होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडं सर्वांचच लक्ष लागलेलं आहे. याचदरम्यान, कसब्यासह चिंचवडमधील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. निकालाला अवघे काही तास शिल्लक असतानाच सोशल मीडियावर एक कविता चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे.

भाजपसह व महाविकास आघाडीकडून कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपसह आघाडीच्या दिग्गज नेतेमंडळींची पोटनिवडणुकीच्या प्रचारात उतरवली होती. उद्या होणाऱ्या मतमोजणीत आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर(Ravindra Dhanekar) आणि भाजपचे हेमंत रासने यांच्यात कोण विजयाचा गुलाल उधळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

मतदानानंतर देखील आघाडी आणि भाजप उमेदवारांमध्ये चांगलाच संघर्ष पाहायला मिळाला आहे. धंगेकर आणि रासनेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यानंतर निकालाआधीच महाविकास आघाडीचे धंगेकर आणि भाजपचे रासने यांचे विजयी फ्लेक्स लावण्यात होते. तसेच चिंचवडमध्येही अश्विनी जगताप यांच्या विजयाचे प्लेक्स झळकले आहे.

निकालाआधीच एक कविता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

Who is dhangekar? ज्याने पाडला गणेश बिडकर, केला गड सर

Who is dhangekar? ज्याने वाटायला लावले, चांदीच्या विटा, सोन्याचे डॉलर

Who is dhangekar? प्रचाराला लावले RSSचे केडर, भले-भले मोठे बिल्डर

Who is dhangekar? देशाचे नेते फिरवले गल्लीभर, धास्तीने जागेच रात्रभर

Who is dhangekar? ज्याने अश्रू आणले ओठांवर, बंगल्याचे ओझे पेठांवर

Who is dhangekar? ज्याने आठवायला लावले पुण्येश्वर, नदीत उतरून पाहाय लावले ओंकारेश्वर

Who is dhangekar? जबरदस्तीने पैसे वाटतो हरिहर, नाकारता हात उचलतो आया-बहिणींवर

Who is dhangekar? घाम फुटलाय ज्याच्या धाकावर, ज्याने खोबऱ्याचे तेल आणलय कपाळावर, नाकावर.

कळले का❓Who is dhangekar..

अशा आशयाची ती कविता आहे. याकवितेमुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. आता या कवितेला भाजपकडून कसं प्रत्युत्तर देण्यात येतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

धंगेकर आणि रासनेंविरोधात गुन्हा दाखल..

कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काल (रविवारी) मतदान झाले. राज्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या कसबा पेठच्या पोटनिवडणुकीत मतदानानंतरही वाद संपण्याचे नाव घेत नाही. भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

मतदानाच्या आदल्या दिवशी (शनिवारी) कसबा पेठेत भाजपचे पदाधिकारी हे मतदारांना पैसे वाटत होते, असा आरोप करीत धंगेवर यांनी केला होता. त्यानंतर ते उपोषणास बसले होते. आचारसंहिता असताना त्यांनी कसबा गणपती समोर उपोषण केल्याप्रकरणी निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्याविरोधात आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT