शिवसेनेच्या 39 आमदारांसह 'त्या' 16 जणांचाही ठाकरे सरकारवर विश्वास नव्हता...शिंदे गटाने टाकला नवा डाव

Shivsena News : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली.
Eknath Shinde Vs Uddhav Thackeray
Eknath Shinde Vs Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Supreme Court hearing News : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आज सुनावणी झाली. न्यायालयात शिवसेनेच्या (शिंदे गट) वतीने ज्येष्ट वकिल निरज किशन कौल यांनी युक्तीवाद केला. उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे.

न्यायालयात युक्तीवाद करत असताना कौल म्हणाले, शिवसेनेच्या 39 आमदारांसोबत आता महाविकास आघाडीच्या 16 आमदारांचाही ठाकरे सरकारवर विश्वास नव्हता, असा युक्तीवाद आज शिंदे गटाचे वकील कौल यांनी केला. ही सुनावणी याच आठवड्यात संपवणार असल्याचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी स्पष्ट केले.

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray
Supreme Court hearing : सरन्यायाधीशांचे महत्त्वपूर्ण निरीक्षण : तर शिंदे मुख्यमंत्री होऊ शकले नसते...

नवीन सरकार स्थापन करण्यामागे केवळ शिवसेना (Shivsena) विधीमंडळ पक्ष नाही तर राजकीय पक्ष सुद्धा सामिल आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमधून जरी 39 आमदार बाहेर पडले नसते, किंवा ते अपात्र ठरले असते तरी ठाकरे सरकार कोसळले असते. राहुल नार्वेकर यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीवेळी मतदान घेण्यात आले होते. त्या वेळी आघाडीचे 16 आमदार गैरहजर होते. नेमक्या याच गोष्टीचा संदर्भ घेत कौल यांनी आज युक्तीवाद केला.

कौल म्हणाले, शिवसेनेचे 39 आमदार बाहेर पडले नसते, किंवा ते अपात्र जरी ठरले असते तरीही ते सरकार पडले असते. कारण अध्यक्षपदाच्या निवडीवेळी महाविकास आघाडीचे 16 आमदार गैरहजर होते. या लोकांचे मत ठाकरे सरकारला नव्हते, त्याचा अर्थ त्यांनाही सरकारवर विश्वास नव्हता, त्यामुळे सरकारने विश्वास गमावला होता, असा युक्तीवाद कौल यांनी केला.

दहाव्या सुचीनुसार विचार केला तर तुम्ही जरी म्हणत असले की आम्हीच खरी शिवसेना आहोत, तरी दोन गट तर आहेत, फुट पडल्यावर दरवेळी पक्ष सोडलाच जातो असे होत नाही, अशी महत्त्वपूर्ण टिप्प्णी सरन्यायाधीशांनी कौल यांच्या युक्तीवादावर केली. दोन्ही गट पक्षातच असले तरी दहावी सूची लागू होईल, कोणत्या गटाकडे बहुमत आहे याने दहाव्या सूचीच्या तरतुदींवर परिणाम होत नाही, असे निरीक्षणही न्यायाधीशांनी नोंदवले.

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray
Supreme Court hearing : सरन्यायाधीशांचे महत्त्वपूर्ण निरीक्षण : तर शिंदे मुख्यमंत्री होऊ शकले नसते...

दरम्यान, उद्या या सुनावणीचा शेवटचा दिवस आहे. उद्या शिंदे गटाच्या वतीने कौल, त्यांच्यानंतर वकिल महेश जेटमलानी युक्तीवाद करणार आहेत. त्यानंतर तुषार मेहता राज्यपालांच्या वतीने युक्तीवाद करणार आहेत. त्यानंतर ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी युक्तीवाद करणार आहेत. त्यामुळे उद्या ही सुनावणी संपणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com