मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेसोबत बंड केल्यानंतर सेना आणि शिंदे गटामध्ये कमालीचा दुरावा निर्माण झाला असून आम्हीच खरी शिवसेना आणि पक्षचिन्हही आमचचं,असा दावा सेना आणि शिंदे गटाच्या वतीने करण्यात येत आहे.
यासोबतच आता शिवसेनेची (Shivsena) परंपरा असलेला दसरा मेळाव्यावरून देखील सेना आणि शिंदे गटात मोठी चुरस लागली आहे. शिवाजी पार्कवर मेळावा कुणाचा होणार याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. मात्र, यामध्ये सेनेला उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आणि दसरा मेळावा हा शिवतीर्थावर होणार हे निश्चित झाले आहे.
दरम्यान आता शिंदे गट आणि सेनेचे दोन मेळावे होणार आहेत. मात्र या दोन्ही मेळाव्याच्या वेळी या एकाचवेळी आल्या तर कुणाच भाषण ऐकणार हे असा सवाल राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेतील विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांना माध्यप्रतिनिधीने विचारला यावेळी त्यांनी आपल्या मिश्किलपणे उत्तर दिले आहे. यामुळे त्यांच्या दिलेल्या उत्तराची जोरदार चर्चाही होत आहे. (Ajit Pawar Latest Marathi News)
एकाच वेळी मुख्यमंत्री शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे भाषण सुरु झाले तर आपण कुणाचे भाषण ऐकणार?,असा प्रश्न पवारांना माध्यम प्रतिधींनी विचारला. यावर अजितदादांनी त्यांच्या अंदाजात उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, एकाच वेळी दोन्ही भाषणे सुरु झाली तर उद्धव ठाकरेंचे भाषण पहिल्यांदा ऐकू मग एकनाथरावांचे, असे ते म्हणाले. तसेच माध्यमांना टोला लगावत ते पुढे म्हणाले की, तुम्ही रिपीट करतच असता, तुमचे कामच आहे. त्यामुळे दुसरे चॅनेल लावायचे आणि दुसरे भाषण ऐकायचे यात काय आहे? अर्धा तास पुढे मागे झाले तरी बिघडलं कुठे? तुम्ही दिल्लीचं कसं दाखवत होता, एकीकडे ठाकरेंचे भाषण सुरु होते आणि ते भाषण झाल्यावर एकनाथरावांचे भाषण दाखवले. त्यात तुम्ही तरबेज आहात. आम्ही बघणारे काही काळजी करण्याचे कारण नाही, असा चिमटाही त्यांनी माध्यमांना काढला.
यांना विचारण्यात आला. दसरा मेळाव्याला कोणाचेही भाषण ऐकले आणि एकाच वेळी दोन्ही भाषणे सुरु झाली तर उद्धव ठाकरेंचे भाषण पहिल्यांदा ऐकू. मग एकनाथरावांचे, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. तसेच प्रसारमाध्यमांना टोला लगावत, तुम्ही रिपीट करतच असता. तुमचे कामच आहे. त्यामुळे दुसरे चॅनेल लावायचे आणि दुसरे भाषण ऐकायचे. यात काय? अर्धा तास पुढे मागे झाले तरी बिघडले कुठे? दिल्लीचे कसे दाखवत होता. एकीकडे उद्धव ठाकरेंचे भाषण सुरु होते. ते भाषण झाल्यानंतर तुम्ही एकनाथरावांचे भाषण दाखवले. त्यात तुम्ही तरबेज आहात. आम्ही बघणारे काही काळजी करण्याचे कारण नाही, असा चिमटा अजित पवार यांनी काढला.
दरम्यान, उच्च न्यायालयाने शिवसेनेला दिलेल्या परवानगीनंतर सेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर होणार आहे. तर मुख्यमंत्री शिंदेंचा बीकेसी मैदानावर मेळावा होणार आहे. दोन्ही गटाकडून या मेळाव्यांचे टीझरही लॉंच झाले असून दोन्ही मेळाव्यांच्या वेळाही जवळपास सारख्याच दिसत आहेत. या मेळाव्यासाठी गर्दी जमवण्यासाठी दोन्ही गटाकडून जोरदार तयारी केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.