मुंबई : शिवसेनेने भाजप सोबतची युती तोडून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) स्थापन करत सत्ता स्थापन केली तेव्हापासून सेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये रोजच आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेसोबत बंड केल्याने आता शिंदे गट आणि भाजपकडून सातत्याने शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर सातत्याने टीका केली जात आहे.
दरम्यान, भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातून उद्धव ठाकरे यांचे अस्तित्व पुसले जाण्याच्या भीतीने त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली असल्याने ते बुडत्या काँग्रेसला वाचविण्यासाठी शिल्लक सेनेचा हात पुढे करण्याची तडजोड करून आता दोन्ही पक्षांना बुडविणार आहे, अशी घणाघाती टीका उपाध्ये ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. (Uddhav Thackeray, Keshav Upadhye Latest News)
उपाध्ये आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, "भारत जोडो यात्रेसाठी शिल्लक सैनिकांची कुमक तर शिल्लकसेनेचा दसरा मेळावा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भरवशावर. उद्धवराव, काँग्रेस राष्ट्रवादीच्या मदतीने मुख्यमंत्रीपद बळकावून झाले. आता दसऱ्याचे विचारांचे सोने पवार-सोनियांकडे गहाण. त्यापेक्षा शिल्लकसेना अधिकृतपणे त्यांच्याकडे आऊटसोर्स करा", अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
पुढे उपाध्ये म्हणाले, दसरा मेळाव्याकरिता गर्दी जमविण्याचे अभूतपूर्व आव्हान ठाकरेंसमोर उभे राहिल्याने उरल्यासुरल्या पेंग्विन सेनेच्या आवाक्याबाहेरच्या या आव्हानास सामोरे जाऊन लाज वाचविण्यासाठी ठाकरे यांची जोरदार धडपड सुरू झाली. त्यासाठी त्यांनी शिल्लक सेनादेखील काँग्रेसच्या दावणीला बांधून इतिहासाची पुनरावृत्ती केली. आधी राष्ट्रवादीपुढे गुडघे टेकल्याने ठाकरेंचे नेतृत्व संपले, आता काँग्रेसच्या वळचणीस जाऊन उरलीसुरली सेना संपविण्याचा त्यांचा इरादा स्पष्ट झाला. विश्वासघाताने, जनादेश धुडकावून मिळविलेले मुख्यमंत्रीपद टिकविण्याच्या धडपडीतून राष्ट्रवादी काँग्रेसकडे पक्ष गहाण टाकून त्यांनी अगोदर शिवसेनेची विल्हेवाट लावली. आता शिवाजी पार्कवरील मेळाव्याचा फज्जा उडण्याच्या भीतीने त्यांनी काँग्रेसच्या कुबड्या घेतल्या आहेत, अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
दरम्यान, राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा राज्यात फज्जा उडणार याची जाणीव असल्याने काँग्रेसने ‘गांधी यात्रे’ची लाज वाचविण्यासाठी सैनिकांची कुमक देण्याच्या अटीवर ठाकरे यांच्या मेळाव्यासाठी गर्दी पुरविण्याची ग्वाही दिली, असा गौप्यस्फोटही उपाध्येंनी केला आहे. आता उपाध्येंच्या टीकेला शिवसेनेकडून काय उत्तर दिले जाते हे बघावे लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.