Pune politic's : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे मानसपुत्र समजले जाणारे दिलीप वळसे पाटील यांनी पवारांची साथ सोडून अजितदादांसोबत जाणे सर्वाधिक चर्चिले गेले आहे. वळसे पाटील हे शरद पवार (Sharad Pawar) यांचे सर्वांत आवडते शिष्य मानले जायचे; त्यामुळे त्यांनी पवारांना सोडून अजित पवारांसोबत केला गेला, असा प्रश्न राज्यभरातून विचारला जात आहे. त्याला वळसे पाटील यांचे अत्यंत निकटवर्तीय शरद सहकारी बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांनी उत्तर दिले आहे. (Why did Walse Patil leave Sharad Pawar's side and go with Ajit Dada?)
वळसे पाटील (Dilip Walse Patil) हे अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत जाण्याबाबत राजकीय आणि इतर गोष्टींची चर्चा होत असताना त्यांच्या समर्थकांनी मात्र वेगळाच दावा केला आहे. ते म्हणाले की वळसे पाटील यांचा मतदारसंघ हा आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातील ३९ गावे मिळून बनलेला आहे. या मदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी दिलीप वळसे पाटील हे अजित पवारांसोबत जाऊन सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. पूर्ण विचार करूनच वळसे पाटील यांनी हा निर्णय घेतला आहे. तो संदेश कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवावा, असे आवाहनही शहा यांनी केले आहे.
आंबेगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांची मंगळवारी मंचर येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात बैठकीत शहा यांनी वळसे पाटील हे सरकारमध्ये का सहभागी झाले याबाबत भाष्य केले. शहा म्हणाले की, डिंभे धरणातील पाण्याचा प्रश्न सर्वांना माहिती आहे. त्यावर तोडगा न काढल्यास घोड आणि मीना नदीवरील बंधाऱ्यांमध्ये पाणी सोडले जाणार नाही. त्या बंधाऱ्यात फक्त पावसाचे पाणी साठले जाईल. त्यामुळे बंधारे दिवाळीनंतर कोरडे पडतील, त्यावर सरकारच्या माध्यमातून उपाय काढण्यात येईल.
कळमोडी धरणाचे पाणी आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागाला मिळावे. दोनशे बेडचे तांबडेमळा येथील उपजिल्हा रुग्णालय, एसटी आगार, निघोटवाडी येथील पांडवदरा पाझर तलाव आदी महत्वाची कामे मार्गी लावण्यासाठी दूरदृष्टी ठेवून आणि पूर्णतः विचार करूनच दिलीप वळसे पाटील राज्य सरकारमध्ये सहभागी झाले आहेत, असेही शहा यांनी स्पष्ट केले.
मुंबईत बुधवारी (ता. ४ जुलै) सकाळी ११ वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. त्या बैठकीला आंबेगाव तालुक्यातून ५०० हून अधिक कार्यकर्ते हजर राहणार आहेत, असे विवेक वळसे पाटील यांनी नमूद केले, तर आंबेगावची संपूर्ण राष्ट्रवादी ही दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत आहे, असे आदिवासी सामाजाचे नेते सुभाष मोरमारे यांनी सांगितले.
भीमाशंकर साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे,पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, बाजार समितीचे सभापती वसंतराव भालेराव, उपसभापती सचिन पानसरे, सचिन भोर, सुषमा शिंदे, शिवाजीराव ढोबळे, गणपतराव इंदोरे, मच्छिंद्र गावडे, राम गावडे, माणिक गावडे, सविता सैद आदी या बैठकीला उपस्थित होते.
‘त्यांना सडेतोड उत्तर द्यावे’
शरद पवार यांच्या पक्षाला ज्यांनी आतापर्यंत कधीच मतदान केले नाही. असे काही लोक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना भडकावून देऊन वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करीत आहेत. कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना सडेतोड उत्तर देण्याचे काम करावे, असे आवाहन आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडियाचे प्रमुख संतोष गावडे यांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.