Ravindra Dhangekar  Sarkarnama
पुणे

Pune Congress : नेत्यांचे फोटो लावत नाहीत अन् आंदोलनालाही येत नाहीत, मग धंगेकरांना काँग्रेसचं तिकीट कशाला?

Pune Congress Ravindra Dhangekar News : "जर कोणता नेता राष्ट्रीय नेत्या सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे फोटो लावणार नाही, अशाना उमेदवारी देऊ नका असे मत मी वरिष्ठांकडे मांडले आहे."

Sudesh Mitkar

Pune News, 07 Sep : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर कसब्यातील आमदार रवींद्र धंगेकर यांचे फासे काहीसे उलटे पडताना पाहायला मिळत आहेत. विधानसभा निवडणूक जवळ येत आहे तसा त्यांना पक्षांतर्गत विरोध वाढत असल्याचा चित्र पाहायला मिळत आहे.

काँग्रेस पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत जे पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे फोटो लावत नाहीत आणि आंदोलनाला 50% पेक्षा कमी वेळा उपस्थित राहतात अशांना पक्षाने तिकीट देऊ नये, अशी मागणी वरिष्ठांकडे केली आहे. त्यांचा रोख कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्याकडे असल्याचं बोललं जात आहे.

पुणे (Pune) शहरात सध्या काँग्रेसचा एकमेव आमदार कसबा विधानसभा मतदारसंघांमध्ये आहे. त्यामुळे कसबा विधानसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसला सुटणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे. या मतदारसंघातून पोटनिवडणुकीद्वारे काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवून रवींद्र धंगेकर हे आमदार झाले आहेत.

भाजपचा बालेकिल्ला उध्वस्त करून निवडणूक जिंकलेल्या रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना काँग्रेसने लोकसभा निवडणुकीमध्ये देखील उतरवलं होतं. मात्र, लोकसभा निवडणुकीत धंगेकर यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यांच्या कसबा विधानसभा मतदारसंघात देखील त्यांना पिछाडीवर रहावं लागलं.

त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये कुठे तरी रवींद्र धंगेकरांचा दावा कमजोर झाल्याचं चित्र दिसत असतानाच काँग्रेस (Congress) मधील इतर नेत्यांनी देखील कसबा विधानसभा मतदारसंघाचे तिकीट काँग्रेस कडून आपल्याला मिळावं यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असणाऱ्यांकडून अर्ज मागवले होते.

कसबा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास धंगेकर यांच्यासह पाच जणांनी अर्ज केला आहे. यामध्ये काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी महापौर कमल व्यवहारे, मुख्तार शेख, संगीता तिवारी आणि बाळासाहेब दाभेकर यांचा समावेश आहे. या नेते मंडळींनी देखील काँग्रेस हाय कमांडकडे विधानसभा तिकिटासाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीत रवींद्र धंगेकर कसब्यातून पिछाडीवर राहिल्याचं कारण देत यंदा आपल्याला संधी मिळावी असा प्रचार या इच्छुकांकडून करण्यात येत आहे.

अशातच आता पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी वरिष्ठ नेत्यांकडे एक भूमिका मांडली आहे. ही भूमिका जर वरिष्ठ नेत्यांच्या पचनी पडली तर रवींद्र धंगेकर यांचा काँग्रेसकडून तिकीट मिळण्याचा संघर्ष आणखी गडद होण्याची शक्यता आहे. याबाबत माध्यमांना प्रतिक्रिया देताना अरविंद शिंदे म्हणाले, "जर कोणता नेता राष्ट्रीय नेत्या सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे फोटो लावणार नाही, अशाना उमेदवारी देऊ नका असे मत मी वरिष्ठांकडे मांडले आहे.

कोणत्याही नेत्याला काँग्रेस पक्ष व्यक्तिगत राजकारण करणाऱ्यांना संधी पक्ष देणार नाही. कोणी काँग्रेस विचाराशी एकरूप नसेल उमेदवार असेल तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये राज्यातील वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे."

यावेळी तुमचा रोख आमदार रवींद्र धंगेकर यांच्याकडे आहे का? असं विचारलं असता शिंदे म्हणाले, माझा रोख काँग्रेसमधील कोणी एका व्यक्तीकडे नाही तर शहरात अस कोणी काँग्रेस नेता असेल कोणी पदाधिकारी हे काँग्रेस बैठक किंवा आंदोलनला 50 टक्के उपस्थितीत नसतील त्यांना उमेदवारी देताना विचार करावा अशी आमची मागणी आहे. मात्र शेवटी पक्ष श्रेष्ठी निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असं देखील शिंदे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT