Mahayuti News : मिटकरींच्या ट्विटनं महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर; म्हणाले, "शिंदेंच्या काही मंत्र्यांना..."

Amol Mitkari On Eknath Shinde Group : "शिंदे सेनेतील काही मंत्र्याना भाजप व राष्ट्रवादी दोन्ही नको आहेत. त्यांना भाजप आणि राष्ट्रवादी दोघांसोबत निवडणूक लढवावी, असे वाटत नसल्याने ते अशी वक्तव्य करत आहेत."
Ajit Pawar, Eknath Shinde
Ajit Pawar, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 07 Sep : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' योजनेवरून सध्या महायुतीत श्रेयवादाची लढाई सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्र्यांचे नाव वगळून ही योजना आम्ही आणल्याचा दावा केला जात असून अजित पवार एकटेच कसे या योजनेचे श्रेय घेऊ शकतात, असा सवाल एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) शिवसेनेतील मंत्र्यांकडून उपस्थित केला जात आहे.

अशातच आता अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी लिहिलं की, शिंदे सेनेतील काही मंत्र्याना भाजप व राष्ट्रवादी दोन्ही नको आहेत. त्यांना भाजप आणि राष्ट्रवादी दोघांसोबत निवडणूक लढवावी, असे वाटत नसल्याने ते अशी वक्तव्य करत आहेत.

प्रत्येकाने आपल्या परीने योजनांचा प्रचार करणे त्यात चुकीचे नाही. हा फायदा महायुतीचा आहे. सेना मंत्र्याना हे कळत नसावं? असा सवाल उपस्थित करत शिवसेना शिंदे (Shivsena) गटावर मोठा आरोप केला आहे. शिवाय यावेळी त्यांनी एक फोटोही पोस्ट केला आहे. ज्यामध्ये केवळ देवेंद्र फडणवीसांचा फोटो असून लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये दिल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, या बॅनरवर अजित पवारांचा फोटो नाही. त्यामुळे अजूनही लाडकी बहीण योजनेवरून महायुतीत धुसफूस सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.

Ajit Pawar, Eknath Shinde
Sharad Pawar : 'वस्तादा'च्या डावाच्या केवळ चर्चेनेच आणखी एका बड्या नेत्याला फुटला घाम

शिंदे-पवार गटाचे आरोप प्रत्यारोप नेमके काय?

अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्र्यांचे नाव वगळून ही योजना आम्ही आणल्याचा दावा केला जात आहे. या शिंदे गटाच्या आक्षेपावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील म्हणाले, आक्षेप घेण्यासारखं काही नाही.

केंद्राच्या अनेक योजना पंतप्रधानांच्या नावाने आणि राज्यातील योजना मुख्यमंत्र्यांच्या नावाने असतात. लाडकी बहीण योजनेचा शॉर्टफॉर्म म्हणून त्याचा वापर जाहिरातीत केलेला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अर्थमंत्री म्हणून ही योजना मांडल्याचं त्यांनी सागितंलं होतं.

Ajit Pawar, Eknath Shinde
Cabinet Meeting : खटका उडालाच; लाडक्या बहिणीवरून मंत्रिमंडळ बैठकीत शिंदे अन अजितदादांच्या मंत्र्यांत खडाजंगी!

तर यावर शिंदेंचे मंत्री संजय शिरसाट म्हणाले, "आमची नाराजी नाही, मात्र यामुळे गैरसमज निर्माण होतात. कार्यकर्त्यांना आपल्या नेत्याबद्दल आदर असणं स्वाभाविक आहे. अर्थमंत्री, गृहमंत्री या सर्वांचे प्रमुख मुख्यमंत्री असतात. एकनाथ शिंदे लाडकी बहीण योजना त्यांनी आणली नाही. मुख्यमंत्री प्रमुख असतो, त्यामुळे 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' आणली.

त्यामुळे श्रेय हे अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि सर्व मंत्रिमंडळाचे आहे. एखाद्या प्रस्तावाला मंजुरी देताना मंत्रिमंडळ मान्यता देते. उत्साही कार्यकर्त्यांनी योजनेचं नाव बदलू नये. नावात बदल केल्यास गैरसमज पसरायला वेळ लागणार नाही."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com