Vinayak Mete Relatives New, Pune Sarkarnama
पुणे

ड्रायव्हर रोज स्टेटमेंट का बदलतोय; मेटेंच्या नातेवाईकांचा प्रश्‍न !

हा घात आहे का अपघात हे आम्हाला कळायला हवे.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : शिवसंग्राम संघटनेचे सर्वेसर्वा स्वर्गीय विनायक मेटेंसोबत (Vinayak Mete) अपघाताच्यावेळी असलेला चालक एकनाथ कदम (Eknath Kadam) वारंवार स्टेटमेंट का बदलतोय, असा प्रश्‍न स्वर्गीय मेटे यांच्या नातेवाईकांना पडला आहे. मेटे यांचे भाचे बाळासाहेब चव्हाण (Balasaheb Chavan and Ashish Mete) व पुतणे अशिष मेटे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन प्रश्‍न उपस्थित केले आहेत.

पत्रकार परिषदेत बोलताना बाळासाहेब चव्हाण म्हणाले, ‘‘ या दुःखातून आम्ही सावरलो नाही. मात्र, तीन दिवस पूर्ण झाल्यानंतर आम्ही मीडिया समोर यायचे ठरवले. हा घातपात का अपघात हे निष्पन्न झाले नाही. चालक कदम रोज नवी स्टेटमेंट देत आहे. अपघात झाल्यानंतर मला फोन आले. साहेबांकडे तीन ड्रायव्हर आहेत. त्यातले सोबत कोण आहे हे मला माहित नव्हते.एकनाथ कदम सोबत आहे, असे कळल्यानंतर मी त्याला मी फोन केला. मी त्याला त्यांचे लोकेशन विचारले. रोज सोबत असणारा चालक कोण बोलतयं असे विचारत होता.’’

चालक कदम याला मी सातत्याने लोकेशन विचारत होतो. मात्र, तो नुसता रडत होता. सोबत असलेल्या एका तिऱ्हाईत व्यक्तीला त्याने फोन दिला. त्या व्यक्तीने तिथे अँब्युलन्स आल्याचे मला सांगितले. चालकाला काही झाले नाही, पण साहेब जागेवर गेले आहेत, असे त्या व्यक्तीने सांगितले असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. हा चालक रोज सातत्याने स्टेटमेंट बदलत चालला आहे. त्यामुळे याला घात की अपघात म्हणायचे, असा प्रश्‍न चव्हाण यांनी केला.

सरकारने समिती नेमली. पण त्याचा पुढे काहीच झाले नाही, असे चव्हाण म्हणाले. हा घात आहे का अपघात हे आम्हाला कळायला हवे. आम्ही या दुःखातून सावरलो नाही. सर्व चूक चालक एकनाथ कदम यांची आहे, असा आरोप बाळासाहेब चव्हाण यांनी केला.‘सीसीटिव्ही’मध्ये आम्हाला कुठेच काही दिसले नाही. चालक सतत कोणाला फोन करत होता, असा प्रश्‍न करीत त्याचा संपर्क कोणाशी होता. त्याचे कॉल डिटेल्स मिळायला हवेत, असे चव्हाण यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT