MLA Mukta Tilak Sarkarnama
पुणे

स्वपक्षाच्या सत्ताधाऱ्यांवर का संतापल्या आमदार मुक्ता टिळक

स्थायी समिती व प्रशासन नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल गंभीर नाही.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : शहराच्या मध्यवर्ती भागातील रस्त्याच्या दुरवस्थेवर नागरिकांकडून टीका केली जात असताना, पुण्यातल्या भारतीय जनता पार्टीच्या आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांनीही स्थायी समिती आणि प्रशासनावर निशाणा साधला आहे. नागरिकांची गैरसोय होत असताना त्यावर स्थायी समिती आणि प्रशासन गंभीर नाही, त्यांनी त्यांच्यातील हेवेदावे त्वरित मिटवावे आणि शिवाजी रस्ता (Shivaji Road) चांगला करून द्यावा, असा सल्ला आमदार टिळक यांनी दिला आहे.

पाणी पुरवठा, सांडपाणी वाहिनी याचे काम करण्यासाठी गेल्या १० महिन्यापासून शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता यासह इतर भागात काम सुरू आहे. हे काम करत असताना योग्य नियोजन नसल्याने नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. आता हे रस्ते १० ते १५ फेब्रुवारी दरम्यान दुरुस्त केले जातील असा दावा प्रशासनाने केला आहे. तसेच स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनीही ही माहिती दिली होती.

आमदार मुक्ता टिळक यांनी अंदाजपत्रकात बाजीराव रस्त्यावर उड्डाणपूल प्रस्तावित करून त्यासाठी ‘स’ यादीतून दोन कोटी रुपये तरतूद केली. पण हा प्रकल्प करणे शक्य नसल्याने या दोन कोटी पैकी एक कोटी रुपये शिवाजी रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी वर्गीकरण करण्याचा प्रस्ताव टिळक यांनी दिला होता. यामध्ये प्रशासनाने माझी दिशाभूल करून या निधीची गरज नसल्याचे सांगितले. पण नंतर निधीची गरज असल्याचे सांगून निधीची मागणी केली. यामध्ये स्थायी समिती अध्यक्ष रासने यांच्याशीही चर्चा करूनही व निधीची गरज असतानाही वर्गीकरण करण्याचा निर्णय करण्यास दोन महिने लावले.

यासर्व प्रकारावरून स्थायी समिती व प्रशासन नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल गंभीर नाही. त्यांनी परस्परांमधील हेवेदावे संपवावे. मला यामध्ये कोणतीही श्रेयवादाची लढाई लढवायची नाही. शिवाजी रस्ता खूप रहदारीचा असल्याने नागरिकांची सोय होणे महत्त्वाचे आहे, असे आमदार मुक्ता टिळक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT