Manoj Jarange Patil Pune Sabha Sarkarnama
पुणे

Manoj Jarange Patil Pune News : कुणबी प्रमाणपत्र मागितले तर आक्षेप का? जरांगेंचा खडा सवाल

Manoj Jarange Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंची आज पुण्यातील राजगुरुनगर येथील खेडमध्ये सभा झाली

अनुराधा धावडे

Manoj Jarange Rajgurunagar Sabha : "आपला आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा, कुणबी शब्द वापरायचे. कुणबी म्हणजे शेत, शेती. त्यात सुधारणा झाली आणि 'शेती' हा शब्द आला. मग कुणबी प्रमाणपत्र मागितले तर त्यावर आक्षेप का? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला. मराठा आणि कुणबी यांच्यात फरक आहे. दोन्हीही वेगवेगळे आहेत. पण जरांगे पाटील मराठा आणि कुणबी एकच आहेत, असे म्हणतात. जरांगेंनी जातीचा आणि घटनेचा अभ्यास करावा', असा सल्ला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जरांगे यांना दिला होता. राणे यांच्या या सल्ल्याला आपल्या भाषणातून जरांगेनी एकप्रकारे उत्तर दिले.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंची आज (दि.२०) पुण्यातील राजगुरुनगर येथील खेडमध्ये सभा झाली. या वेळी ते बोलत होते. जरांगे म्हणाले, आम्ही आरक्षण मागितले. सरकारने एक महिन्याचा वेळ मागितला, पण आपण ४० दिवसांचा वेळ दिला. आता सरकारला आरक्षण द्यावेच लागणार, हे माहिती आहे. कायदा पारित करण्यासाठी समितीही कामाला लागली. आता आरक्षण मिळेपर्यंत मागे हटायचे नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जरांगे पाटील म्हणाले, मराठ्यांचे दोन प्रकार पहिला म्हणजे क्षत्रिय मराठा आणि दुसरा मराठा शेती करतो, शेतात राबतो, कष्ट करतो. मग मराठ्यांची पोटजात कुणबी होत नाही का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. प्रत्येक घरातील व्यक्तीला आरक्षण माहिती होणे गरजेचे आहे. सरकारने आरक्षणाचा विषय गांभीर्याने घ्यावा. सरकारने आरक्षण वेळेत दिले असते तर आत्महत्या झाल्या नसत्या, अशी खंतही त्यांनी या वेळी व्यक्त केली.

सरकारने चाळीस दिवसांचा वेळ मागितल्यानंतर समितीने काम सुरू केले. कोणताही कायदा परित कऱण्यासाठी त्याला ठोस पुऱावा मिळत नाही, तोपर्यंत तो पारित होत नाही. कायदा पारित करण्यासाठी एका पानाचा पुरावाही पुरेसा असतो. पण आरक्षणासाठी सरकारला पाच हजार पानांचे पुरावे मिळाले, असेही त्यांनी या वेळी सांगितले. तसेच, विशेष अधिवेशन बोलावून कायदा पारित करा, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT