Amol Balwadkar-Chandrakant Patil-Devendra Fadnavis Sarkarnama
पुणे

Amol Balwadkar : अमोल बालवडकरांचं तिकिट का कापलं?; व्हायरल व्हिडिओकडे बोट दाखवत चंद्रकांत पाटलांनी सांगितले कारण...

Chandrakant Patil Statement : पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ९ मध्ये भाजपने तिकीट नाकारल्याने अमोल बालवडकर राष्ट्रवादीत दाखल झाले असून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांना उमेदवारी दिल्याने लढत चुरशीची झाली आहे.

Sudesh Mitkar

Pune, 10 January : पुणे महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 9 ची निवडणूक अतिशय हाय व्होल्टेज बनली आहे. या प्रभागामधून भाजपने माजी नगरसेवक असलेले अमोल बालवडकर यांना तिकीट नाकारत लहू बालवडकर यांना तिकीट दिलं आहे. त्यानंतर अमोल बालवडकर यांनी पक्षांनी आपली मोठी फसवणूक केल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेदवारी दिली आहे.

या प्रकरणांमध्ये गेल्या काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोपाचं फैरी झडत असताना आता मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil ) यांनी अमोल बालवडकर यांचे तिकीट का कापलं? याबाबतचा खुलासा पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. तसेच वायरल होत असलेल्या व्हिडिओचा दाखला दिला आहे.

पुण्यातील भाजपचे उमेदवार लहू बालवाडकर यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट करत अमोल बालवडकर (Amol Balwadkar) यांचे कुख्यात गुंड नीलेश घायवळ याच्यासोबतचे व्हिडिओ शेअर केले आहेत. हे व्हिडिओ सध्या पुण्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत असून या मुद्द्यावर मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे किती सुसंस्कृत नेते आहेत. हे आता आपल्याला कळलं असेल. काही लोक माझं तिकीट का कापलं? याबाबत कांगावा करत आहेत.

पुणे महापालिका निवडणुकीत 42 माजी नगरसेवकांची तिकीट पक्षाने कापली आहेत, त्याला विविध कारणे होती. परंतु कोणीही जाब विचारला नाही. आमच्या पक्षामध्ये मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्याची पद्धत नाही. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखातं आहे. त्यामुळे त्यांना वेळेत कळलं काहीतरी घोटाळा होईल, हे लक्षात घेऊनच त्यांनी अमोल बालवडकर यांचे तिकीट कापलं.

भाजपच्या तिकिटावर जर हा उमेदवार निवडणूक रिंगणात असतात आणि त्यानंतर हा व्हिडिओ समोर आला असता तर घोटाळा झाला असता त्यामुळे हे तिकीट कापण्यात आलं आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

मी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करणार आहे. ज्यांचे नीलेश घायवळसोबत फोटो, व्हिडीओ आहेत, त्याची घायवळला शोधायला मदत होईल. त्यामुळे या व्यक्तींची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी, अशी आपली मागणी असल्याचं पाटील यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT