Amol Balwadkar vs Lahu Balwadkar : बालवडकर विरुद्ध बालवडकर, प्रभाग 9 मध्ये हाय-व्होल्टेज लढत, चंद्रकांतदादा म्हणाले, ‘डायरीत लिहून ठेवा...’

NCP BJP Pune Municipal Election : पुणे महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाक नऊमधील अमोल बावडकर विरुद्ध लहू बालवडकर लढत ही भाजपसह राष्ट्रवादीसाठी देखील प्रतिष्ठेची झाली आहे.
Amol Balwadkar vs Lahu Balwadkar
Amol Balwadkar vs Lahu Balwadkar sarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडाला असताना, प्रभाग क्रमांक 9 (सूस-बाणेर-बालेवाडी-पाषाण) ही लढत शहरातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली आहे. येथे भाजपचे उमेदवार लहू बालवडकर आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमोल बालवडकर यांच्यात थेट सामना रंगणार आहे. त्यातच मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लहू बालवडकर हे राज्यांमध्ये सर्वाधिक मतं घेऊन विजयी होतील, असे भाकीत केला आहे. चंद्रकांत पाटील यांच्या या भाकीतामुळे सर्वांचेच लक्ष या प्रभागाच्या निवडणुकीकडे लागले आहे.

माजी भाजप नगरसेवक अमोल बालवडकर यांना पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांच्या पॅनेलमध्ये गायत्री मेढे-कोकाटे, बाबुराव चांदेरे आणि पार्वती निम्हाण यांचा समावेश आहे. दुसरीकडे, भाजपने लहू बालवडकर यांना उमेदवारी दिली असून, त्यांच्या पॅनेलमध्ये रोहिणी चिमटे, गणेश कळमकर आणि मयुरी कोकाटे आहेत.

नुकताच लहू बालवडकर यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता. ज्यात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. भाजप नेत्यांनी प्रभागातील विकासकामे आणि लहू बालवडकर यांच्या निष्ठेवर भर दिला.

राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमोल बालवडकर यांच्या प्रभागात सभा घेऊन प्रचाराला चालना दिली. नुकत्याच झालेल्या सभेत अजित पवारांनी पुणे महापालिकेच्या कारभारावर टीका करत प्रभागाच्या विकासाचा आराखडा मांडला. तर अमोल बालवडकर यांनी भाजपने आपल्याला तिकीट नाकारून आपल्यावरतअन्याय केला असल्याचा सांगत आपण मोठा विजय साकारणार असल्याचा दावा केला आहे.

Amol Balwadkar vs Lahu Balwadkar
Pune Election: संक्रांतीच्या नावाखाली मतांच्या खरेदीचा बाजार; प्रशासनानं झाकून घेतले डोळे

हा प्रभाग आयटी हब आणि निवासी सोसायट्यांनी व्यापलेला असल्याने विकास, रस्ते, पाणी आणि वाहतूक या मुद्द्यांवर लढत अवलंबून आहे. मात्र ही लढत सध्या निष्ठावंत विरुद्ध बंडखोर अशीच रंगालयाची पाहायला मिळत आहे.

चंद्रकांत पाटली काय म्हणाले?

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लहू बालवडकर यांच्या प्रचारात उतरून मोठी भविष्यवाणी केली. ते म्हणाले, "प्रभाग 9 मधून भाजपचे लहू बालवडकर हे महाराष्ट्रातील सर्वाधिक मतांनी नगरसेवक म्हणून विजयी होतील. डायरीत लिहून ठेवा, ही भविष्यवाणी खरी ठरेल." त्यावर अमोल बालवडकर यांनी पाटील यांची कोणतीही भविष्यवाणी खरी ठरत नसल्याचे सांगितले आहे.

घायवळ सोबतचा व्हिडिओ व्हायरल

अमोल बालवडकर यांचा कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या सोबतचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ भाजप समर्थकांकडून शेअर केला जात आहे .त्यामुळे प्रभाग ९ मधील ही 'बालवडकर विरुद्ध बालवडकर' लढत आधीच हाय-व्होल्टेज असताना हा नवा व्हिडिओ निवडणुकी प्रचाराला आणखी तापणार आहे.

Amol Balwadkar vs Lahu Balwadkar
Maharashtra Political Updates: दिवसभरात काय राजकीय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लिकवर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com