Ajit Pawar news 
पुणे

local body election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलल्या? अजित पवारांनी दिलं उत्तर

सरकारनामा ब्युरो

Ajit Pawar | "स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका (Local Body Election) या फेब्रुवारी २०२२ मध्येच व्हायला हव्या होत्या. ९२ नगरपरिषदांच्या ओबीसी आरक्षणावरील सुनावणी वारंवार पुढे ढकलत आहे. आता डिसेंबरमध्ये जवळपास दहा महिने होतील पण अजुन निवडणूका नाहीत. मधल्याकाळात अशी काही राजकीय स्थित्यंतरे घडली की निवडणुका सातत्याने पुढे-पुढे ढकलण्यात आल्या. सत्ताधारी असो की विरोधी पक्षाचे लोक असोत, सर्वांनी एक निर्णय घेतला पाहिजे. या निवडणुका लवकरात लवकर झाल्या पाहिजे. पण राज्य सरकारचं निवडणुकाच्या वादावर फक्त तारीख पे तारीख सुरू आहे, असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी लगावला आहे.

अजित पवार आज (२८ नोव्हेंबर) पुण्यात माध्यमांशी ते बोलत होते. राज्यात महागाई, बेरोजगारी असे अनेक महत्त्वाचे प्रश्नही आहेत. पण ते बाजूला ठेऊन ज्यांची काही गरजच नाही, अशा विषयांवर चर्चा करत बसतो. त्यावर विचार व्हायला हवा असंही पवार यांनी म्हटलं. त्याचवेळी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची वक्तव्यावरही भाष्य केलं आहे. मोठ्या पदावर बसणाऱ्या व्यक्तीच अशा प्रकारची विधान करतात. त्यावेळी त्यांना त्या पदावर बसवणाऱ्या ज्या व्यक्ती असतात त्यांनीच त्यांना सांगितलं पाहिजे.

कधी कधी आमच्याकडूनही बोलताना एखादी चुक होते. पण आम्ही दिलगीरी व्यक्त करुन मोकळे होतो. पण राज्यपालांकडून हे एकदा नाही अनेकदा घडलं आहे. त्यामुळे राज्यपालांना पदावर बसवणाऱ्यांनीच त्यांना समज द्यायला पाहिजे. महत्त्वाचे विषय सोडून ते वादग्रस्त वक्तव्य करत आहेत असं पवार म्हणाले.

अनेकदा राज्यपालही त्यांना आपल्या राज्यात जायची इच्छा असल्याचं खासगीत बोलत असतात, मग ते कारण आहे का हेही कळलं पाहिजे. पण त्यांचं लंगड समर्थन कोणी करु नये. असा टोलाही अजित पवार यांनी मारला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अशी वक्तव्य करण्याचं काहीच कारण नाही. आणि महाराष्ट्र ते खपवून पण घेणार नाही. त्यामुळे शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्याबाबत जाणीवपुर्वक वक्तव्य करत असतील त्याचा विचार वरिष्ठांनी केला पाहिजे असही त्यांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT