Eknath shinde group
Eknath shinde group Sarkarnama
पुणे

पन्नास खोक्यांचा वाद कोर्टात जाणार : राजकारण पुन्हा तापणार

सरकारनामा ब्यूरो

पुणे : पन्नास खोक्यांचा वाद आता न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. कारण, एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते विजय शिवतारे (Vijay Shivtare) हे पन्नास खोक्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आणि युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना नोटीस पाठवणार आहेत. त्यामुळे पन्नास खोक्यांच्या आरोपांवरून पुन्हा राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. (Will send notice to leaders accusing Shinde group MLAs of fifty boxes : Vijay Shivtare)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील ४० आमदारांवर पन्नास खोके घेतल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून होत आहे. काही दिवसांपूर्वी आमदार बच्चू कडू आणि आमदार रवि राणा यांच्यातही वाद झाला होता. त्यानंतर राष्ट्रवादीच्या शिर्डीतील शिबिरात खासदार सुप्रिया सुळेंकडून त्यावर भाष्य करण्यात आले होते. वारंवार होणारे हे आरोप थांबवण्यासाठी शिंदे गटाकडून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. त्यानुसारच शिवतारे हे वरील तिघांना नोटीस पाठवणार आहेत.

याबाबत माजी राज्यमंत्री शिवतारे म्हणाले की, येत्या १ ते २ दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांना शिंदे गट नोटीस बजावणार आहे. आज दुपारपर्यंत अंतिम नोटीस तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर ती संबंधितांना पाठविण्यात येणार आहे.

शिंदे गटाच्या ५० आमदारांच्या वतीने २ हजार ५०० कोटीचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व आमदारांकडून कन्सेट (consent) घेण्याचे काम सध्या सुरू आहे. याबद्दल वकिलांशी बोलणी सुरू आहेत आणि येत्या १ ते २ दिवसांत या नोटीस बजावल्या जातील, अशी माहिती शिवतारे यांनी दिली

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT