संजय राऊत यांना भेटण्याचे सुषमा अंधारे यांनी सांगितले कारण...

ईडीच्या कारवाईबाबत आता संसदेच्या सभागृहात चर्चा व्हायला हवी.
Sanjay Raut-Sushma Andhare
Sanjay Raut-Sushma AndhareSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे ज्येष्ठ नेते आहेत. मी धाकटी लेक असून त्यांच्या भेटीची उत्सुकता होती. मला त्यांच्या भेटीसाठी १०२ दिवस थांबावे लागले. लांब पल्ल्याच्या तोफेकडून (संजय राऊत) काही टिप्स मिळतील का, यासाठी मी राऊत यांची भेट घेतली, असे शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी स्पष्ट केले. (Sushma Andhare told to why She meet Sanjay Raut...)

सत्र न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर अंधारे यांनी आज संजय राऊत यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमाशी बोलताना अंधारे यांनी विविध विषयावर भाष्य केले. खासदार राऊत यांच्यावर झालेली कारवाई ही बेकायदा असल्याचे न्यायालयाने मान्य केले आहे. त्यामुळे ईडीच्या कारवाईबाबत आता संसदेच्या सभागृहात चर्चा व्हायला हवी, असेही सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केले.

Sanjay Raut-Sushma Andhare
Ajit Pawar नाराज आहेत का ? ; मावळातील कार्यक्रमात अजितदादांचे स्पष्टीकरण..

अंधारे म्हणाल्या की, भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या हे राऊत यांच्या मुलीच्या लग्नातील मेहंदीवाल्यांच्या हिशेब मागतात. पण, बीकेसी मैदानात झालेल्या सभेचा हिशेब का मागत नाहीत. त्यावर किरीट सोमय्या का बोलत नसतील. ते आमदार प्रताप सरनाईक, खासदार भावना गवळी यांना माफिया म्हणत होते. आता त्यांच्यावर एफआरआय कधी दाखल करणार आहेत, असा सवालही अंधारे यांनी केला.

Sanjay Raut-Sushma Andhare
राज्याचे मंत्री गिरीश महाजनांना सुटेना दूध संघाच्या सत्तेचा मोह

गृहमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांना झेपत नाही. त्यांचे मंत्री असभ्य बोलतात. पण, त्यांना फडणवीस गुळगुळीत बोलत आहेत, असे सांगून चित्रा वाघ यांच्यावरही अंधारे यांनी निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, भाजपकडे आल्यावर फाईल बंद होतात, भाजप प्रवेशाला नकार दिला तर पुन्हा टाच आणली जात आहे, हे थांबल पाहिजे.

ती बाळासाहेब यांची शिवसेना नाही, ते बाळासाहेब यांचे शिपाई नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपमध्ये जाण्याशिवाय पर्याय नाही. शिंदे गटाबरोबर आता यापुढे कोणी भाऊ जाणार नाहीत, गेलेले भाऊ पुन्हा शिवसेनेत येतील, असा विश्वासही अंधारे यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com