अजित पवार-चंद्रकांत पाटील
अजित पवार-चंद्रकांत पाटील सरकारनामा
पुणे

पुणे-पिंपरीत अजित पवारांना जमेना म्हणून शरद पवार लक्ष घालणार का ?

सरकारनामा ब्यूरो

पुणे : पुणे-पिंपरीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार लक्ष घालणार याचा अर्थ अजित पवारांना जमेना म्हणून शरद पवार लक्ष घालत आहेत का असा खोचक प्रश्‍न भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज उपस्थित केला. पवारांनी लक्ष घातले तरी त्याचा काय परिणाम होणार असा प्रश्‍नदेखील त्यांनी हसत-हसत केला.

पुण्यात पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले, ‘‘ पुणे-पिंपरीत भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. गेल्या साडेचार वर्षात जनतेच्या हिताची मोठी कामे आम्ही केली आहेत.भाजपाला रोखणे अजित पवार यांना शक्य होत नसल्याने पवार यांना मदतीला बोलविण्यात येत असावे.’’

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महिनाभरात दोनवेळा पिंपरीचा दौरा केला. ते पुण्यातही लक्ष घालणार असल्याची बातमी आल्याने त्यावर विचारलेल्या प्रश्‍नावर पाटील यांनी भूमिका मांडली. पुणे-पिंपरीतील सत्ता राखण्यासाठी भाजपानेदेखील तयारी केली असून साडेचार वर्षातील कामावर आम्ही पुन्हा सत्तेत येऊ असा विश्‍वास पाटील यांच्यासह सर्वच भाजपा नेते व्यक्त करीत असतात.

अंमली पदार्थ विरोधी विभागाचे प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांच्याबाबत काही चित्रफित आली असेल तर त्याची चौकशी होईल. मात्र, नवाब मलिक करीत असलेले आरोप चुकीचे आहेत. वानखेडे यांना घरी बसविण्याची भाषा मलिक करीत आहेत.या प्रश्‍नावर बोलताना ‘जो गरजेल तो बरसेल का ? असा प्रतिप्रश्‍न पाटील यांनी केला.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT