पुणे-नाशिकसह मुंबई-अमरावतीतही आरोग्याच्या परीक्षेत गैरप्रकार

आर्थिक झळ आणि मनस्तापाशिवाय त्यांच्या हाती काहीच लागलेले दिसत नाही.
Rajesh Tope
Rajesh TopeSarkarnama
Published on
Updated on

पुणे : नाशिकच्या गिरनार केंद्रावर खासगी गाडीतून ऐनवेळी दाखल झालेल्या प्रश्नपत्रिका, पुण्यातील आबेदा इनामदार कॉलेजमध्ये तब्बल तासभर उशिराने सुरू झालेली परीक्षा, अमरावतीत विद्याभारती केंद्रावर दुसऱ्याच पदाच्या प्रश्नपत्रिका आणि मुंबईत दुपारच्या सत्रात सील फुटलेल्या प्रश्नपत्रिकांमुळे आरोग्यसेवेतील गट ‘क’ची लेखी परीक्षा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

प्रवेशपत्र न मिळणे, अस्तित्वात नसलेले केंद्र आणि प्रचंड सावळ्या गोंधळामुळे आरोग्य सेवेची परीक्षा पुढे ढकलावी लागली होती. महिनाभराचा वेळ मिळूनही रविवारी पार पडलेल्या परीक्षेत काही केंद्रांवर गोंधळ पाहायला मिळाला. नाशिकच्या गिरनार केंद्रावरील उमेदवार म्हणतो,‘‘परीक्षेची वेळ झाली तरी प्रश्नपत्रिका केंद्रावर दाखल झाल्या नाहीत. काही वेळाने एका खासगी गाडीत साधे कुलूप असलेल्या पेटीत उत्तर भारतीय व्यक्ती प्रश्नपत्रिका घेऊन आले. त्यातील एका पेटीचे सीलही फुटले होते. अक्षरशः चौथी-पाचवीच्या विद्यार्थ्यांसारख्या परीक्षा पार पडली.’’ शेकडो किलोमीटरचा प्रवास करत, गैरसोयींचा सामना करत उमेदवार वेगवेगळ्या शहरांमध्ये परीक्षेसाठी दाखल झाले.

Rajesh Tope
आरोग्य विभागाच्या परीक्षेत तिसऱ्यांदा गोंधळ : राजेश टोपे आता राजीनामा द्याच

आर्थिक झळ आणि मनस्तापाशिवाय त्यांच्या हाती काहीच लागलेले दिसत नाही. राज्यातील चार लाख पाच हजार उमेदवारांनी साडेचार हजार पदांसाठी रविवारी परीक्षा दिली. मात्र, विविध ठिकाणी घडलेल्या या गोंधळामुळे परीक्षेच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Rajesh Tope
राज्य सरकारने चालवलाय युवकांच्या ‘करिअर’शी खेळ

मी कनिष्ठ लिपिक पदासाठी अर्ज केला होता. प्रवेशपत्रावरही ते छापून आले होते. मात्र ऐन परीक्षेला मला परिचारिकेच्या पदाची प्रश्नपत्रिका आली. पर्यवेक्षकांना आणि अधिकाऱ्यांना विचारले तर ते न्यासाच्या लोकांना भेटा असे सांगतात. टोलवाटोलवीची उत्तरे देतात. मी कुणाकडे न्याय मागू, असे परीक्षेला आलेल्या एका महिला उमेदवाराने सांगितले.

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com