Rupali Chakankar Mangeshkar Hospital sarkarnama
पुणे

Mangeshkar Hospital : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला दणका! तनिषाची 'ती' माहिती उघड केल्याने कारवाईचे निर्देश, भिसे कुटुंबीयांची पोलिसांमध्ये धाव!

Women’s Commission Orders Action Against Dinanath Mangeshkar Hospital : मृत तनिषा आणि भिसे कुटुंबीयांची वैयक्तिक माहिती परवानगीविना सार्वजनिक केल्याने मानसिक त्रास झाल्याची तक्रार सविता भिसे यांनी राज्य महिला आयोगाकडे केली होती.

Roshan More

Mangeshkar Hospital News : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपाचारासाठी आलेल्या गर्भवती तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणी आरोग्य विभागाच्या चौकशी समितीने रुग्णालयाला दोषी ठरवले आहे. त्यातच या प्रकरणाची अंतर्गत तपासणी करण्यासाठी मंगेशकर रुग्णालयाने समिती नेमली होती. या समितीच्या अहवालामध्ये तनिषा यांच्या विषयी खासगी बाबी उघड केल्या होत्या. त्यामुळे याविरोधात भिसे कुटुंबाने महिला आयोगाकडे तक्रार केली होती.

महिला आयोगाने या तक्रारीची गंभीर दखल घेत याविषयी पुणे पोलीस आयुक्त आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचे अध्यक्ष यांना यावर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले असून आयोगास केलेल्या कार्यवाहीचा चौकशी अहवाल तात्काळ सादर करण्यास सांगितले आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी यासंबंधी ट्विट करत माहिती दिली आहे.

चाकणकर यांनी सांगितले की, पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने तनिषा भिसे यांच्या मृत्यूनंतर केलेल्या अंतर्गत चौकशीचा अहवाल सार्वजनिक केला.मृत तनिषा आणि भिसे कुटुंबीयांची वैयक्तिक माहिती परवानगीविना सार्वजनिक केल्याने मानसिक त्रास झाल्याची तक्रार सविता भिसे यांनी राज्य महिला आयोगाकडे केली आहे.

भिसे कुटुंबाची पोलिसात तक्रार

महिला आयोगाकडे तक्रार करणाऱ्या भिसे कुटुंबीयांकडून अलंकार पोलिस चौकीत तक्रार देखील देण्यात आली आहे. अंतर्गत अहवालाच्या नावाने तनिषा हिच्या विषयीची माहिती सार्वजनिक केल्या प्रकरणी या अहवालावर ज्या डाॅक्टारांच्या स्वाक्षऱ्या आहेत त्यासर्वांवर कारावईची मागणी भिसे कुटुंबीयांकडून करण्यात आली आहे.

धर्मादाय रुग्णालयांना सूचना

रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत सांगितले की, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने धर्मादाय रुग्णालय असूनही तनिषा भिसे यांना त्यामाध्यमातून मदत न केल्याचे चौकशी अहवालात ही समोर आले आहे. तेव्हा सर्व धर्मादाय रुग्णालयांनी यापुढे 'धर्मादाय' असा उल्लेख असलेला फलक दर्शनी भागात लावावा, त्यानुसार असलेल्या सुविधा, नियमावली यांची माहितीही लावावी यासाठी तातडीने कार्यवाही करावी असे निर्देश राज्य महिला आयोगाने आयुक्त, धर्मादाय यांच्या कार्यालयाला दिले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT