Mahila Ayog On Shantabai Kopargaonkar : एकेकाळी तमाशाचा फड गाजवणाऱ्या लावणी सम्राज्ञी शांताबाई कोपरगावकर यांच्यावर आज भीक मागण्याची वेळ आली. मुंबईतील लालबाग परळ येथील हनुमान थिएटरमध्ये त्यांनी एक काळ गाजवला. आता मात्र वयोमानाने महाराष्ट्राच्या या लावणी सम्राज्ञीवर भीक मागायची वेळ आली. सध्या त्यांच्या लावणी म्हणतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यानंतर महिला आयोगाच्या वतीने मोठा निर्णय घेण्यात आला आहे. (Latest Marathi News)
सध्या शांताबाई यांचे वय ७० आहे. त्यांना सरकारकडून कधीतरी तुटपुंजी पेन्शन मिळते. ती पेन्शन पुरेशी नसल्याने त्यांच्यावर कोपरगावच्या बस स्थानकावर भीक मागण्याची वेळ आली. दरम्यान, ३०-४० वर्षांपुर्वी शांताबाई यांनी आपल्या आदाकारीने राज्यभर तमाशाचे फड गाजवले. त्यांच्या जीवावर अनेक कुटुंबीयांचे पोट भरत होते. आता मात्र त्यांनाच पोट भरण्यासाठी झगडा करावा लागत असल्याचे समोर आहे. याबाबत माहिती मिळताच महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी शांताबाई यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला. याबाबत त्यांनी एक ट्विटद्वारे माहिती दिली.
चाकणकर म्हणाल्या, "तमाशा कलावंत शांताबाई कोपरगावकर या ज्येष्ठ मराठी कलाकारावर उतारवयात दयनीय अवस्थेत राहण्याची वेळ आली. याबाबत माहिती मिळाताच आयोगाच्या वतीने तातडीने जिल्हा महिला बालविकास अधिकारी अहमदनगर यांना संपर्क करण्यात आला आहे. सध्या शांताबाई नगरच्या एका रुग्णालयात आहेत. त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांची महिला बाल विकास विभागामार्फत वृद्धाश्रमात व्यवस्था करावी असे जि. म.बा. अहमदनगर यांना सांगण्यात आले आहे."
यावेळी शाताबाई यांना सन्मानाने जगता येण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही चाकणकर यांनी सांगितले. रुपाली चाकणकर म्हणाल्या, "महाराष्ट्र शासनाने कलाकारांच्या निवृत्ती वयात त्यांना समाधानाने जगता यावे यासाठी काही योजना सुरू केल्या आहेत. शांताबाईंना राज्य शासनाच्या योजनांमधून सन्मानजनक मानधन मिळावे, निवृत्ती वेतन मिळवून देणार आहे. यासाठी आयुक्त, महिला बाल विकास यांना पत्र लिहून शांताबाईंना मदत मिळवून देण्यासाठीचे निर्देश आयोग देत आहे."
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.