Bawankule Request to Fadnavis : देवेंद्रजी सौजन्य सोडा ; ठाकरेंच्या टीकेनंतर बावनकुळेंचे फडणवीसांना आवाहन

तुमच्यात हिंमत असेल तर पावसाळी अधिवेशनात भ्रष्टाचाराची प्रकरणे आकडेवारीसह विधीमंडळात मांडावीत.
Devendra Fadnavis-Chandrashekhar Bawankule-Uddhav Thackeray
Devendra Fadnavis-Chandrashekhar Bawankule-Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Baramati News : उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांच्यावर देवेंद्र फडणवीस किंवा मी कधीही वैयक्तिक स्वरुपाची टीका केलेली नाही. पण, आता देवेंद्र फडणवीस यांच्यावर व्यक्तिगत टीका होणार असेल तर सौजन्य सोडून द्या, अशी विनंती आम्हाला त्यांना करावी लागेल. आम्ही फडणवीस यांच्यावरील वैयक्तीक टीका अजिबात खपवून घेणार नाही, असा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे यांना दिला. (Chandrashekhar Bawankule's bitter criticism of Uddhav Thackeray)

बारामती (Baramati) येथील एका कार्यक्रमासाठी आलेले बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) हे माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी ठाकरेंना (Uddhav Thackeray) इशारा देत फडणवीसांना सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, उद्धवजी, तुम्ही एकच दिवस विधीमंडळात येता आणि भाजपवर आरोप करता, हे काही योग्य नाही. जर खरंच तुमच्याकडे भ्रष्टाचाराची प्रकरणे असतील तर ती तुम्ही आकडेवारीसह विधीमंडळात मांडावीत. तुमच्यात हिंमत असेल तर ती पावसाळी अधिवेशनात मांडा. सरकार त्यातील तथ्य तपासून निश्चित योग्य तो निर्णय घेईल.

Devendra Fadnavis-Chandrashekhar Bawankule-Uddhav Thackeray
BJP Vs NCP : भाजपचा डाव यशस्वी; राष्ट्रवादीला फायदा होऊ नये म्हणून शिरूर खरेदी-विक्री संघाची निवडणूक तीन महिने लांबणीवर

पंकजा मुंडे यांच्या एमआयएम आणि बीआरएस पक्षाच्या ऑफरबाबतही बावनकुळे यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, गोपीनाथ मुंडे यांच्या सावलीत पंकजा मुंडे ह्या वाढलेल्या आहेत. भाजप त्यांच्या रक्तातच आहे. त्यामळे एमआयएम, बीआरएस किंवा इतर कोणत्याही पक्षाचा त्या विचारच करू शकत नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Devendra Fadnavis-Chandrashekhar Bawankule-Uddhav Thackeray
Supriya Sule On BJP Leader : निवडणुकांमुळे मुंबईची टोळी वारीत; सुप्रिया सुळेंची नाव न घेता भाजप नेत्यांवर टीका

राष्ट्रवादीतील घडामोडींवर भाष्य करताना ते म्हणाले की, छगन भुजबळ आणि अजित पवार यांना कार्यकारी अध्यक्ष केले जाईल, असा माझा अंदाज होता. पण, प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांना त्या पदावर संध देण्यात आलेल आहे. अजितदादांसारख्या नेत्याला जबाबदारी मागावी लागते, ही दुर्देवी बाब आहे, अर्थात हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र राष्ट्रवादीचा प्रयत्न हा मीडियाची स्पेस घेण्याचा आहे. हे नाट्य जनतेला भूलथापा देण्यासाठी सुरु आहे.

Devendra Fadnavis-Chandrashekhar Bawankule-Uddhav Thackeray
Subhash Deshmukh challenge to Patole : सुभाष देशमुखांचं नाना पटोलेंना आव्हान; ‘माझी इमारत बेकायदेशीर असेल तर तत्काळ पाडा’

भाजपच्या वतीने बारामती विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघात घर चलो अभियान सुरु करण्यात आले आहे. प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे. गेल्या नऊ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने केलेल्या कामांची माहिती घरोघरी जाऊन आम्ही देणार आहेात. बारामती विधानसभा मतदारसंघातील ६० हजार कुटुंबांपर्यंत, तर लोकसभा मतदारसंघातील साडेतीन लाख कुटुंबापर्यंत आम्ही जाणार आहेात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com