Abhijit Katke
Abhijit Katke  Sarkarnama
पुणे

Abhijit Katke : पुण्याच्या अभिजीत कटकेने पटकावला हिंदकेसरी किताब

सरकारनामा ब्यूरो

Abhijit Katke : महाराष्ट्र केसरी ठरलेल्या पैलवान अभिजीत कटके याने मानाचा हिंदकेसरी किताब पटकावला आहे. अभिजीत कटके हा मुळचा पुण्याचा आहे. हैदराबाद येथे झालेल्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत अभिजीत कटके याने खुल्या गटातून हा मान मिळवला आहे.

भारतीय कुस्ती महासंघाने दि.५ जानेवारी ते ८ जानेवारी या दरम्यान हैदराबाद आणि तेलंगणा येथे अखिल भारतीय ५१ वी हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत अभिजीने हरियाणाच्या सोमवीरचा ५-० असा पराभव केला.

अभिजीत कटके याने पटकावलेला हिंदकेसरीचा किताब ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट असून या पार्श्वभूमीवर पुण्यात फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला आहे.

दरम्यान, अभिजीत कटके याने या पूर्वी महाराष्ट्र केसरी हा किताब पटकावलेला आहे. तसेच दोन वेळा उपमहाराष्ट्र केसरी हा ही किताब पटकावलेला आहे. त्यानंतर आता अभिजीतने हिंद केसरीची (Hindkesari) मानाची गदा पटकावून महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्यामुळे त्यांच महाराष्ट्रभर कौतुक करण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT