Sudhir Mungantiwar :..तर संजय राऊत खासदारकीचा राजीनामा देणार का?; सुधीर मुनगंटीवारांचं खुलं आव्हान

Sudhir Mungantiwar : संजय राऊत मुनगंटीवारांचं आव्हान स्वीकारणार का?
Sudhir Mungantiwar
Sudhir MungantiwarSarkarnama
Published on
Updated on

Sudhir Mungantiwar : राज्यातील हे सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही, हे सरकार फेब्रुवारीपर्यंत पडेल, असं ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं. तर त्यांच्या या विधानाला आता राज्याचे वन व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी संजय राऊतांना खुलं आव्हान दिलं आहे.

१५ मार्चपर्यंत हे सरकार पाडून दाखवा, जर समजा सरकार पडले नाही तर संजय राऊत खासदारकीचा राजीनामा देणार का?, असं खुलं आव्हान सुधीर मुनगंटीवार यांनी दिलं आहे. पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.

Sudhir Mungantiwar
Pankaja Munde : कॉम्प्रमाईजचं राजकारण मला शक्य नाही; पंकजा मुंडेंचा रोख नेमका कुणाकडे?

मुनगंटीवार म्हणाले, ''महाराष्ट्रातील उद्योग बाहेर गेले असं राज ठाकरे (Raj Thackeray) बोलले असतील तर ते मी एकले नाही. परंतु असं असेल तर ठाकरे यांनी त्याबाबत कागदपत्रे समोर आणावीत. उगाच राजकीय सत्तेपोटी अशी वक्तव्ये करू नयेत. उद्योग राज्याबाहेर गेले हा निव्वळ अपप्रचार आहे. तर याबाबत मुख्यमंत्र्यांकडे महाविकास आघाडीच्या काळातील अपयशावर श्वेतपत्रिका काढण्याची मागणी करणार आहे, असं ते यावेळी म्हणाले.

तसेच जवळपास ४०० चित्रपटांच्या थकलेल्या अनुदानाबाबत ते मुनगंटीवार म्हणाले, ''या चित्रपटांच्या अनुदानासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच चित्रपटाच्या अनुदानासाठी नवी नियमावली करण्यात येणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार मिळणाऱ्या चित्रपटांना दुप्पट अनुदान देण्यात येईल, असंही ते यावेळी म्हणाले.

Sudhir Mungantiwar
Sangram Thopte : काँग्रेस आमदार थोपटे फडणवीसांना भेटले आणि आता केला 'हा' खुलासा...

दरम्यान, राज्यातील हे सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही, हे सरकार फेब्रुवारीपर्यंत पडेल, या संजय राऊतांच्या वक्तव्यावर त्यांनी सरकार पडलं नाही तर संजय राऊत (Sanjay Raut) खासदारकीचा राजीनामा देणार का?, असं थेट आव्हान दिलं आहे. त्यामुळे यावर राऊत काय बोलणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com