CM Eknath Shinde  Sarkarnama
पुणे

Talathi Bharti : तलाठी भरती परीक्षेतील घोटाळ्याच्या चौकशीसाठी सरकार SIT नेमणार का?

Chaitanya Machale

Pune news :  राज्य सरकारच्या वतीने घेण्यात आलेल्या तलाठी भरती परीक्षेत झालेला घोटाळा आजवरच्या शैक्षणिक इतिहासातील आश्चर्यच आहे. या परीक्षेमध्ये काही विद्यार्थ्यांना 200 पैकी चक्क 214 मार्क्स मिळले  आहेत. या परीक्षेत झालेली चूक मान्य न करता विद्यार्थ्यांना अधिक गुण मिळाले तर बिघडले कुठे? असे सांगत राज्यातील सत्ताधारी पक्ष यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत असून या परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप युवक काँग्रेसने केला आहे. तसेच एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे.

महाराष्ट्र सरकारच्या वतीने काही महिन्यांपूर्वी घेण्यात आलेल्या तलाठी तसेच वनरक्षक पदासाठीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आलेला आहे. परीक्षेत एकाच विद्यार्थ्याला वनरक्षक परीक्षेत 54 गुण मिळाले आहेत. तर, तलाठी भरती परीक्षेत 200 पैकी 214 गुण देण्याचा 'पराक्रम" करण्यात आला आहे.

राज्य सरकारच्या (Maharashtra Government) वतीने वेगवेगळ्या पदांसाठी परीक्षा असो, अशा प्रकारांमुळे या परीक्षांमधील पारदर्शकता पूर्णपणे संपल्याचे चित्र यानिमित्ताने समोर आले आहे. आवश्यक तो अभ्यास करून आपल्याला सरकारी नोकरी मिळावी आणि आपले करिअर स्थिरस्थावर व्हावे यासाठी अनेक मुलं कॉलेजमध्ये असल्यापासूनच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असतात. मात्र, अशाप्रकारे राज्य सरकारच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्येच गोंधळ उडत असेल तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या (Congress) वतीने उपस्थित करण्यात आलेला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या परीक्षांचे नियोजन करणाऱ्या संस्थांवर अतिविश्वास ठेवल्यानेच हे प्रकार घडत आहेत. या परीक्षांमधील पारदर्शकता पूर्णपणे संपली असल्याचे उघडकीस आले आहे. चांगली नोकरी मिळावी यासाठी दिवस रात्र मेहनत करून अभ्यास करून परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याची खेळण्याचे काम शिंदे-फडणवीस-पवार सरकार करीत आहे. या सर्व प्रकारांमध्ये आवश्यक ते लक्ष घालून यातील दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे यांनी केली आहे.

राज्यात सत्ता असतानाही याकडे दुर्लक्ष होते आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जर का भ्रष्टाचार होत असेल तर हे सत्ताधाऱ्यांचे मोठं अपयश आहे. या नतदृष्ट सत्ताधाऱ्यांना विद्यार्थी त्यांचे पालक तसेच सर्वसामान्यांच्या हिताशी काहीही देणेघेणे नाही. या संपूर्ण तलाठी भरती परीक्षेचा तपास विशेष पथकामार्फत करून यातील दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच ही तलाठी भरती (Talathi Recruitment) आणि वनरक्षक भरती रद्द करण्यात यावी, अशी मागणीही सुरवसे यांनी केली आहे.

(Edited By - Rajanand More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT