West Bengal News : ममतांच्या गडात होणार मोठी कारवाई? ‘ईडी’ संचालकांनी रातोरात गाठलं बंगाल...

ED Director Rahul Navin : राहुल नवीन हे आज घेणार अधिकाऱ्यांची बैठक...
Rahul Navin, Mamata Banerjee
Rahul Navin, Mamata BanerjeeSarkarnama
Published on
Updated on

CM Mamata Banerjee : काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये सक्तवसुली संचालनालयाच्या (ED) अधिकाऱ्यांवर हल्ल्याची घटना घडली आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्याच्या घरावर अधिकारी छापेमारी करण्यासाठी गेले होते. या घटनेनंतर भाजपने ममता बॅनर्जी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. त्यानंतर आता खुद्द 'ईडी'च्या संचालकांनी सोमवारी रात्रीच बंगाल गाठल्याने चर्चांना उधाण आले आहे.

ईडीचे (ED) संचालक राहुल नवीन (Rahul Navin) सोमवारी रात्री कोलकातामध्ये दाखल झाले आहेत. आज ते अधिकाऱ्यांची बैठक घेणार असून त्यामध्ये हल्ला आणि कारवाईच्याअनुषंगाने मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. कथित रेशन घोटाळ्याच्या चौकशीसाठी तृणमूलचे (TMC) नेते शाहजहाँ शेख यांची चौकशी करण्यासाठी ईडीची टीम त्यांच्या घरी गेली होती.

Rahul Navin, Mamata Banerjee
Tamil Nadu Politics : मुख्यमंत्री स्टॅलिन मोठा निर्णय घेणार; मुलगा उदयनिधी बनणार उपमुख्यमंत्री?

शेख यांच्या घराबाहेर जमलेल्या जमावाने अधिकाऱ्यांवर हल्ला करीत वाहनांची तोडफोड केली. त्यामुळे अधिकाऱ्यांना आल्या पावली परत जावे लागले होते. या घटनेची गंभीर दखल केंद्र सरकारनेही घेतली आहे. घटनेनंतर शेख फरार झाले असून त्यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ईडीवर हल्ला करणाऱ्या संशयितांचाही शोध घेतला जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ईडीकडून सोमवारी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. पोलिसांनी केवळ जामीनपात्र गुन्हा दाखल केला आहे. तसेच एफआयआरची प्रतही दिली नाही. त्याचप्रमाणे पोलिसांनी कोणतीही सुरक्षा दिली नाही, असा आरोपही ईडीने केला होता. त्यानंतर राहुल नवीन हे सोमवारी बंगालमध्ये आल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत.

ईडीच्या संचालकांकडून हल्ल्याची माहिती घेतली जाणार असून कारवाईचा आढावाही घेतला जाईल. तसेच फरार शेख यांच्यावर कारवाईबाबत मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे बंगालमधील ईडीची कारवाई, सुरक्षा याबाबतही महत्त्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे कथित घोटाळ्यांमधील तृणमूलच्या काही नेत्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

R...

Rahul Navin, Mamata Banerjee
India Aaghadi News : मोठी बातमी ! इंडिया आघाडी जागा वाटप बैठक 14 किंवा 15 जानेवारीला होणार ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com