Vote Counting Sarkarnama
पुणे

ZP Election : जिल्हा परिषदेसाठी मतदानाला अवघे दोन दिवस, तुमच्या तालुक्यात किती मतदार? ए टू झेड आकडेवारी वाचा

ZP Pune Voters : शनिवारी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. प्रशासनाने मतदानाची तयारी पूर्ण केली असून पुणे जिल्ह्यातील 13 तालुक्यात किती मतदार आहेत याची आकडेवारी जाहीर केली आहे.

Roshan More

ZP Election News: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी शनिवारी (ता.७) मतदान होणार आहे. या मतदानसाठी पुमे जिल्ह्यात किती मतदार आहेत याची माहिती प्रशासनाने जाहीर केली आहे. जिल्ह्यात ३ हजार ६०५ मतदान केंद्र असून याअंतर्गत पुरुष १५ लाख २२ हजार २५६, स्त्री १४ लाख ५० हजार १४ आणि इतर ९१ असे एकूण २९ लाख ७२ हजार ३५९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

बारामती तालुक्यात २ लाख ६४ हजार ६४२, मावळ २ लाख ३१६, मुळशी १ लाख ७३ हजार ४०१, शिरुर ३ लाख १ हजार ७८६, हवेली २ लाख ५१ हजार ५३३, दौंड २ लाख ७३ हजार १००, इंदापूर ३ लाख २१ हजार २, पुरंदर १ लाख ८९ हजार ४०३, भोर १ लाख ५४ हजार ८१०, वेल्हे ५५ हजार २३०, आंबेगाव १ लाख ८४ हजार ५२, जुन्नर ३ लाख ७ हजार २६० आणि खेड तालुक्यात २ लाख ९५ हजार ८२४ असे एकूण २९ लाख ७२ हजार ३५९ मतदार आहेत.

बारामती तालुक्यात २९९, मावळ २४३, मुळशी २२७, शिरुर ३३७, हवेली २६३, दौंड ३१७, इंदापूर ४००, पुरंदर २३५, भोर २३७, वेल्हे १०५, आंबेगाव २३९, जुन्नर ३६६ आणि खेड ३३७ तालुक्यात असे एकूण ३ हजार ६०५ मतदान केंद्र आहेत. यामध्ये प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे १३ आदर्श व महिला मतदान केंद्र आहेत, अशी माहिती डुडी यांनी दिली आहे.

प्रतिबंधात्मक आदेश जारी

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ शांततेत, निर्भय आणि न्याय वातावरणात पार पाडण्याच्यादृष्टीने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १६३ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशाने नगरपालिका, नगरपंचायत व ग्रामीण भागात शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक मालमत्तेची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरुपात सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगी शिवाय होर्डींग्ज, बॅनर्स, पोस्टर्स व भिंतीवर जाहिरात प्रदर्शित करण्यास ९ फेब्रुवारी २०२६ पर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT