Maharashtra local body elections Sarkarnama
पुणे

Local Body Election : धाकधूक वाढली, पुणे जिल्ह्यातील आरक्षण सोडत, इच्छुकांनी देव ठेवले पाण्यात!

Zilla Parishad Reservation : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचे आरक्षण आज जाहीर होणार आहे. गट आणि गणाच्या आरक्षणाच्या घोषणेकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे.

Roshan More

Local Body Election News : पुणे जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील पंचायत समित्यांची आरक्षण सोडत आज (सोमवार) दुपारी तीन वाजत होणार आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेतील ७३ सदस्यांची सोडत दुपारी 12 वाजता, बहुउद्देशीय सभागृह, ५ वा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे. तसेच याच दिवशी पंचायत समिती सदस्य पदांकरिता आरक्षण सोडतीचे संबंधित तालुक्यात आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण आधीच जाहीर करण्यात आले होते. मात्र, जिल्हा परिषद गट आणि पंचयात समितीच्या गणाच्या आरक्षणाची प्रतिक्षा इच्छुकांना होती. आरक्षण जाहीर झाले नव्हते त्यामुळे छुप्या पद्धतीने इच्छुकांचा प्रचार सुरू होता. मात्र, आता आरक्षण आपल्या सोयीचे जाहीर व्हावे, यासाठी इच्छुकांनी देव पाण्यात ठेवले आहेत. दरम्यान, आरक्षणाच्या घोषणेनंतर खऱ्या अर्थान प्रचाराला जोर येणार आहे.

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ व महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पद्धत व चक्रानुक्रम) नियम २०२५ नुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व त्यामधील स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा आणि सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करण्यात येणार आहेत.

जुन्नर, आंबेगाव, खेड, मुळशी, वेल्हे आणि पुरंदर पंचायत समितीचे आरक्षण सोडत संबंधित पंचायत समिती कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. तर शिरूर पंचायत समितीची सोडत नवीन प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय, शिरूर, मावळ पंचायत समिती - भेगडे लॉन्स, वडगांव मावळ, ता.मावळ, हवेली - उद्यान प्रसाद कार्यालय, १७१२/१ बी, सी व्ही जोशी मार्ग, खजिना विहीर चौक, माडीवाले कॉलनी, सदाशिव पेठ, दौंड पंचायत समिती - बैठक सभागृह, दुसरा मजला, नविन प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय, दौंड येथे होणार आहे.

भोर - अभिजीत मंगल कार्यालय, भोर महाड रस्ता, भोर, बारामती पंचायत समिती- कवी मोरोपंत सभागृह, इंदापूर रस्ता, बारामती आणि इंदापूर पंचायत समितीची आरक्षण सोडत राधिका रेसिडेन्सी क्लब, इंदापूर येथे आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२५ तथा उपजिल्हाधिकारी (रोहयो) डॉ.चारुशीला देशमुख-मोहिते यांनी दिली आहे.

राजगड पंचायत समिती

राजगड (वेल्हे) पंचायत समितीअंतर्गत निर्वाचक गणासाठी विविध प्रवर्गांसाठी आरक्षण सोडत पद्धतीने आज दुपारी 12 वाजता पंचायत समिती सभागृह वेल्हे येथे काढण्यात येणार आहे, असे राजगडचे (वेल्हे) तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी कळविले केले आहे. या आरक्षण सोडतीवेळी संबंधितांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT