Maharashtra Politics Video : एकनाथ शिंदे महायुतीमधून बाहेर, देवेंद्र फडणवीस-अजित पवारांचा 'या' नगरपालिकेसाठी मोठा निर्णय

Ajit Pawar-devendra fadnavis Vs Eknath Shinde : आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेत एकनाथ शिंदेंना अजित पवार-देवेंद्र फडणवीसांनी युतीमधून बाहेर ठेवले आहे.
Eknath Shinde, Devendra Fadnavis and Ajit Pawar
Eknath Shinde, Devendra Fadnavis and Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Ambarnath-Badlapur Politics : आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत महायुती एकत्र लढणार की स्वबळावर याचे चित्र अजुनही स्पष्ट झालेले नाही. मात्र, ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदेंना एकाकी पाडण्याची रणनीती भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसकडून आखण्यात येत असल्याची चर्चा आहे. नवी मुंबई महापालिकेत गणेश नाईकांनी स्वबळाचा नारा देत शिंदेंसोबत युती नको, अशी भूमिका घेतली आहे. त्यातच अंबरनाथ-कुळगाव बदलापूरमध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये युती झाली आहे.

या युतीमध्ये एकनाथ शिंदेंची शिवसेना नाही. त्यामुळे महायुतीमधील पक्षांविरोधातच शिंदेंच्या शिवसेनेला लढावे लागणार आहे. अंबरनाथ-कुळगाव बदलापूर नगरपालिका निवडणुकीत शिंदे हे महायुतीमधून बाहेर आहेत. येथे ते स्वबळावर लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बदलापुरात शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांची मोठी ताकद आहे. मात्र भाजप आमदार किसन कथोरे आणि शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्यात वाद असल्यामुळे युती होणार की नाही याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होत्या. दोन्ही पक्षांकडून इच्छुकांना गळाला लावण्याचं काम सुरू आहे. बदलापुरात पक्षप्रवेशाचे कार्यक्रम सुरू असतानाच भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने युती करत शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का दिलाय.

दहा वर्षांपूर्वी तयार झालेल्या या नगरपालिकेची सत्ता गेल्यावेळी शिवसेनेकडे होती. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदेंनी वर्चस्व ठेवले होते. बदलापूर, अंबरनाथमधील पदाधिकारी एकनाथ शिंदेंसोबत मोठ्या प्रमाणात राहिल्याचे चित्र होते. त्यामुळे या नगरपालिकेत पुन्हा शिवसेनेची सत्ता येणार असा विश्वास शिंदेंचे कार्यकर्ते व्यक्त करत होते.

अंबरनाथ-बदलापूर पालिकेत यापूर्वी शिवसेनेची सत्ता होती. त्यामुळे एकनाथ शिंदे येथे स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे शिंदे विरुद्ध फडणवीस, पवार असे लढतीचे चित्र दिसून येईल. त्यातच अजित पवारांनी आपली ताकद वाढवत राष्ट्रवादी काँग्रेश शरदचंद्र पवार पक्षाचे अंबरनाथाचे शहराध्यक्ष यांना आपला पक्षात प्रवेश देत त्यांच्यावर आपल्या पक्षाच्या शहराध्यक्षपदाची जबाबदारी टाकली आहे.

Eknath Shinde, Devendra Fadnavis and Ajit Pawar
Shivaji Patil Honey Trap : भाजप निकटवर्तीय आमदार हनी ट्रॅप प्रकरणात मोठी अपडेट, बहीण-भावाला अटक

सत्तेसाठी अजित पवारांसोबत

सदाशिव पाटील यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांची नियुक्ती अंबरनाथ शहराध्यक्षपदी अजित पवारांन केली आहे. दरम्यान, राजकारणात विकासासाठी सत्ता महत्त्वाची असते. त्यामुळे सत्तेच्या जवळ राहून काम करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, राष्ट्रवादी-भाजपच्या युतीमध्ये नगराध्यक्षपदासाठी अश्विनी पाटील यांचे नाव पुढे आल्याचे सांगितले जात आहे.

Eknath Shinde, Devendra Fadnavis and Ajit Pawar
Local Body Elections : दिवाळीतच निवडणुकीचे फटाके! पेण नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपची मजबूत चाल! माजी मंत्र्यांचीही तगडी फिल्डिंग

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com