Baramati News: अनेक दिवसांपासून उत्सुकता असलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी बुधवारी (ता. 21) आपले पत्ते खुले केले. बारामतीतील राजकीय गणितेच बदलल्याची चिन्हे या निवडणुकीत समोर येणार आहेत. राष्ट्रवादीने पंचायत समितीच्या दोन जागा भाजपसाठी सोडून दिल्याची चर्चा होती.
मिळालेल्या माहितीनुसार, शिर्सुफळ गणात भाजप नेते बाळासाहेब गावडे यांचे चिरंजिव अनिकेत गावडे यांनी कमळाच्या चिन्हावर तर सुपे गणात उज्वला पोपट खैरे यांनीही कमळाच्या चिन्हावर उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या दोन्ही गणात राष्ट्रवादीने कोणत्याही उमेदवाराला अधिकृत एबी फॉर्मच दिला नसल्याने या दोन्ही जागांवर राष्ट्रवादीने भाजपला बाय दिला आहे का अशी चर्चा बारामतीत सुरु झाली. दरम्यान छाननीनंतर राष्ट्रवादी या दोन गणात दोन उमेदवारांना पुरस्कृत करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
दुसरीकडे नीरावागज गटात भाजप ज्यांच्यावर अवलंबून होते त्या अभिजित देवकाते यांनी त्यांची पत्नी शिवानी यांचा अर्ज घडयाळाच्या चिन्हावर दाखल केल्याने येथे भाजपची चांगलीच पंचाईत झाली. भाजपच्या जिल्हाध्यक्ष व काही स्थानिक नेत्यांच्या मनमानीला कंटाळून आपण राष्ट्रवादीतून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याचे अभिजित देवकाते यांनी सांगितले. पणदरे गटात राष्ट्रवादीचे मंगेश प्रतापराव जगताप यांच्या विरोधात अरविंद जगताप यांचे चिरंजीव सूरज जगताप यांनी भाजपमधून अर्ज दाखल केला आहे.
बारामती तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस विरुध्द भाजप एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्या प्रामुख्याने लढत होईल अशी चिन्हे आहेत. संध्याकाळी उशिरापर्यंत यादी तयार करण्याचे काम प्रशासकीय भवन येथे सुरु होते. शेवटच्या दिवशी शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांनी गर्दी केल्याने निवडणूक निर्णय अधिका-यांच्या दालनात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
आपले उमेदवार शेवटच्या क्षणापर्यंत कोणालाही समजू नये या साठी प्रयत्न केले गेले. अगदी सूचकांनाही आपण कोणत्या उमेदवाराला सूचक आहोत, हे शेवटपर्यंत समजले नसल्याचे काही जणांनी सांगितले.
निवडून येण्याची क्षमता हा एकमेव निकष लावत राष्ट्रवादीने उमेदवारांची यादी दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जातीने मुलाखती घेत सर्वांची मते जाणून घेत जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणात उमेदवारी देऊ केल्याचे यादी पाहिल्यानंतर लक्षात आले.
नगरपरिषदेच्या निवडणूकीत जे बेरजेचे राजकारण करण्याचा आणि नव्या जुन्यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने केले आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडूनही जिल्हा परिषदेच्या दोन तर पंचायत समितीच्या सहा जागा लढविणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष सुरेंद्र जेवरे यांनी दिली.
• सुपा गट : पल्लवी प्रमोद खेत्रे
• गुनवडी गट- शुभांगी कचर शिंदे
• पणदरे गट- मंगेश प्रतापराव जगताप
• वडगाव निंबाळकर गट- रोहिणी संदीप कदम (ढोले)
• निंबूत गट- दिग्विजय जगताप
• नीरावागज गट- शिवानी अभिजित देवकाते
• काऱ्हाटी गण : श्यामला सुनील वाबळे
• गुणवडी गण : शुभांगी सुनील आगवणे
• पणदरे गण : किरण रावसाहेब तावरे
• मुढाळे गण : वैशाली अशोक कोकणे
• वडगाव निंबाळकर गण : जितेंद्र भगवान पवार
• मोरगाव गण : बाबा रामा चोरमले
• निंबूत गण : दिग्विजय धन्यकुमार जगताप
• कांबळेश्वर गण : आशाबाई विठ्ठल वायाळ
• नीरावागज गट : शिवानी अभिजीत देवकाते
• नीरावागज गण : नितीन अरुण काकडे
• डोर्लेवाडी गण : राजश्री भूषण टकले
• सुपा गट- वंदना विशाल कोकरे किंवा भाग्यश्री अमोल बनकर या पैकी एक
• पणदरे गट- सूरज अरविंद जगताप किंवा सदाशिव बाजीराव कोकरे या पैकी एक
• वडगाव निंबाळकर गट- भारती मधुकर लोखंडे किंवा शिवाजी अजिंक्य चौधरी
• निंबूत- दिग्विजय वसंतराव काकडे
• सुपा- उज्वला पोपट खैरे
• का-हाटी- सोनाली प्रमोद खराडे किंवा अश्विनी राजेंद्र मांढरे या पैकी एक
• शिर्सुफळ- अनिकेत प्रभाकर गावडे
• गुनवडी- नीलम राजेंद्र शिंदे
• पणदरे- मच्छिंद्र मनोहर तावरे
• मुढाळे- पौर्णिमा सोमनाथ निंबाळकर
• मोरगाव- रामदास नवले
• वडगाव निंबाळकर- बापूराव फणसे
• निंबूत- प्रकाश जगताप
• कांबळेश्वर- लैला नजीर शेख
• नीरावागज- बापूराव सोपान बागव
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.