Amruta Fadnavis News: मुंबई महानगरपालिकेचा महापौर कोण होणार? मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीसांचा मोठा दावा समोर

Mahapalika Election Results 2026: महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर राज्यातील 29 महानगरपालिकांमध्ये आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे.त्याचसोबत महानगरपालिकेच्या महापौर, उपमहापौरपदाची खुर्ची कोणाला मिळणार याकडेही सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे.
Amruta Fadnavis On bmc .jpg
Amruta Fadnavis On bmc .jpgSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर राज्यातील 29 महानगरपालिकांमध्ये आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे.त्याचसोबत महानगरपालिकेच्या महापौर, उपमहापौरपदाची खुर्ची कोणाला मिळणार याकडेही सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. पण आता याचदरम्यान,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी मुंबईच्या महापौरपदाबाबत मोठा दावा केला आहे.

अमृता फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांचा दावोसचा दौरा,संजय राऊतांचे गंभीर आरोप मुंबईचा महापौर यांसह विविध मुद्द्यांवर आपली रोखठोक उत्तर दिली. एकीकडे मुंबईचा महापौर भाजप की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा होणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात असताना त्यांचा कौल त्यांनी दिला आहे.त्यांनी मुंबईचा महापौर हा महायुतीचा आणि तोही मराठी माणूसच होणार असल्याचा दावा केला आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देशभरातल्या मुख्यमंत्र्याची दावोसला पिकनिक सुरु असल्याची झोंबणारी टीका केली होती. त्या जोरदार प्रत्युत्तर देताना अमृता फडणवीस म्हणाल्या, मुख्यमंत्री हे दावोसला बिझनेससाठी गुंतवणुक आणण्यासाठी गेले आहेत. तिथे महाराष्ट्राला एक प्लटफॉर्म मिळतोय.⁠इकॉनॉमिक डेव्हलपमेंट तिथे मोठ्या प्रमाणात होताहेत.

त्या म्हणाल्या, संजय राऊत काय बोलतात, त्यांची भाषा मला कळत नाही.जो व्यक्ती पिकनिकला जातो तो सकाळी 6 ते रात्री 11 कॉन्फरन्स किंवा मीटिंग करत नाही.पण याचमुळे आपल्या राज्यात आणि देशात गुंतवणूक येत असते.त्यामुळे संजय राऊत यांनी असं म्हणणं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पिकनिकला गेले आहेत ते अतिशय चुकीचं आणि त्यांच्या सगळ्या दाव्यांप्रमाणे निरर्थक असल्याचा पलटवारही त्यांनी यावेळी केला.

Amruta Fadnavis On bmc .jpg
Maharashtra Politics: अकोल्यात मोठी राजकीय घडामोड! भाजपची ठाकरेंच्या शिवसेनेला युतीची ऑफर; महापालिकेवर एकत्र राज्य करणार?

तसंच देवेंद्र फडणवीस हे काही पिकनिकला गेलेले नाहीत.ते पिकनिकला माझ्याशिवाय कसे जातील? असा सवालही अमृता फडणवीसांनी उपस्थित केला.तसेच त्यांनी तीन दिवसांची पिकनिक कधी होत नाही. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पिकनिकला माझ्याशिवाय जाऊच शकत नाही, असंही हटके उत्तर अमृता फडणवीस यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना दिले. त्यांच्या या विधानाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

संजय राऊतांचं विधान काय...?

राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी देशभरातल्या मुख्यमंत्र्यांची पिकनिक दावोसला सुरु आहे. ते संपल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महापौरच्या निवडणुकीत लक्ष घालतील. स्वित्झर्लंडमधल्या दावोसमधील औद्योगिक कॉन्फरन्स सुरू आहे. ती अत्यंत हास्यास्पद असल्याचा आरोपही राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केला.

Amruta Fadnavis On bmc .jpg
Jayant Patil : जयंत पाटलांचा राजकारणात ताकदीने 'उलटा' प्रवास सुरु? सांगलीत त्यांनीच वाढू दिलेल्या 'भाजपला' रोखण्यासाठी बरंच काही गमावलं...

ते म्हणाले, अनेक राज्याचे मुख्यमंत्री एकमेकांना देशात न भेटता दावोसला भेटायला जातात. भारतातल्या कंपन्यांनाच दावोसला बोलावून तिथे मुख्यमंत्री करार करतात.तेही जनतेच्या पैशाच्या करावर. त्यामुळे पंतप्रधानांनी याप्रकरणात लक्ष घालावं असं आवाहन खासदार संजय राऊतांनी यावेळी केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com