Impact of Raj Thackeray's campaign on ZP election results Sarkarnama
पुणे

ZP Election Results: मनसेचा राज्यातील पहिला निकाल, खातं उघडलं! ZP निवडणुकीत पहिले यश

MNS ZP Election Result 2026: भोसरे गट आणि गणातील सर्व जागा राष्ट्रवादीच्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे आल्या आहेत. तर लातूरमधील रेणापूर पंचायत समिती पानगाव गणात मनसेच्या श्रीदेवी प्रकाश गालफाडे यांचा विजय झाला आहे.

Mangesh Mahale

MNS victory in Zilla Parishad:राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी मतदानाचा निकाल (Maharashtra Elections 2026) जाहीर होण्यास सुरवात झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाने उघडले खाते आहे. माढा तालुक्यातील भोसरे गटात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अश्विनी दळवी विजयी झाल्या आहेत. भोसरे गट आणि गणातील सर्व जागा राष्ट्रवादीच्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे आल्या आहेत.

लातूरमधील रेणापूर पंचायत समिती पानगाव गणात मनसेच्या श्रीदेवी प्रकाश गालफाडे यांचा विजय झाला आहे. मनसेने पहिल्यांदाच खातउघडलं. हे मनसेचे या निवडणुकीतील पहिले यश ठरलं आहे. मतमोजणीच्या पहिल्या दीड तासांमध्ये लातूर जिल्हा परिषदेमध्ये भाजपा, शरद पवारांची राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे आणि अपक्ष अशी प्रत्येकाने एक जागा जिंकली आहे. रेणापूर पंचायत समितीमध्ये एकूण 8 गणे आहेत.

छत्रपती संभाजीनगरच्या वडोद बाजार जिल्हा परिषद गटातून मंगेश साबळे हे विजयी झाले आहेत. जालना लोकसभा मतदारसंघातून रावसाहबे दानवे यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवत सव्वा लाखाहून अधिक मत मिळवली होती.

आंबेपूर मतदार संघातून शिवसेनेच्या रसिका केणी यांचा विजय झाला आहे. अटीतटीच्या लढतीत भाजपच्या चित्रा पाटील यांचा पराभव झाला आहे. चित्रा पाटील या भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष आहेत. आंबेपूर मधील पंचायत समितीच्या दोन्ही जागा देखील शिवसेनेकडे आल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT