Sunetra Pawar Voteing sarkarnama
पुणे

Sunetra Pawar Vote : अजितदादांशिवाय पहिलीच निवडणूक, सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्का; पवार कुटुंबीय एकत्र

ZP Election  Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला. आज 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी आज मतदान पार पडत आहे.

Roshan More

Sunetra Pawar News : जिल्हा परिेषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही पहिलीच निवडणूक आहे. अजित पवार हे भल्या पहाटे कामाला सुरुवात करून प्रथम मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावत होते. अगदी त्याच पद्धतीने त्यांच्या पत्नी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काटेवाडी सर्वप्रथम मतदाना हक्क बजावला.

सुनेत्रा पवार यांच्यानंतर पवार कुटुंबातील पार्थ पवार, श्रीनिवास पवार, युगेंद्र पवार, शर्मिला पवार यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला. मतदानाच्या वेळी देखील परिवारातील ऐकी दिसून आली.

12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी आज मतदान पार पडत आहे. दोन्ही राष्ट्रावादी या निवडणुकीसाठी एकत्र आल्या आहेत. अनेक ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादीचे उमेदवार हे घड्याळ चिन्हावर निवडणूक लढत आहेत. खासदार अमोल कोल्हे यांच्या मतदारसंघात देखील सर्व उमेदवार हे घड्याळ चिन्हावर लढत आहेत.

भाजप विरुद्ध राष्ट्रवादी सामना

पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना होतो आहे. अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीने प्रचार सभा रद्द केल्या होत्या. उमेदवारांनी घरोघरी जात प्रचार केला. अजित पवारांच्या निधनानंतर ही पहिलीच निवडणूक असल्याने कार्यकर्ते, पदाधिकारी, उमेदवार भावूक आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT