Pune News: गेली चार वर्षांचे प्रशासकराज संपुष्टात आल्यानंतर काल (बुधवारी)जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे दौंड तालुक्यातील ज्येष्ठ सदस्य वीरधवल जगदाळे यांची, तर आंबेगाव तालुक्यातील विवेक वळसे-पाटील यांची उपाध्यक्षपदी पुढील अडीच वर्षांच्या काळासाठी बिनविरोध निवड करण्यात आली.
पुणे जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला प्रचंड असा बहुमत आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी छोट्या छोट्या गटांमध्ये विखुरलेल्या विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांना एकत्रित ताकतीने विरोध करण्याची भूमिका घेतली.
चांगल्या कामांसाठी सत्ताधाऱ्यांना सहकार्य करू परंतु जनतेच्या प्रश्नांवर जिल्हा परिषद सभागृहात आवाज बुलंद केला जाईल. आणि विकास कामांमध्ये राजकारण किंवा विरोधकांवरील अन्याय सहन केला जाणार नाही, असं देखील स्पष्ट केलं.
या सर्व घडामोडींमध्ये एक गोष्ट चर्चेचा विषय ठरली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांची बैठक सवयीप्रमाणे अध्यक्ष बंगल्यावर बोलाविण्यात आली होती. वास्तविक जोपर्यंत अध्यक्ष निवड होत नाही, तोपर्यंत अध्यक्षांचा क्वीन्स गार्डन येथील 'शिवाई' बंगला उपलब्ध करून दिला जात नाही. तरीदेखील राष्ट्रवादी काँग्रेसकडून अध्यक्ष बंगल्यावर बैठक बोलाविण्यात आली होती.
हि बाब विरोधकांना समजताच विरोधी पक्षाच्या गटनेत्यांनी देखील 'आम्हाला ही याच बंगल्यावर बैठक घ्यायची आहे,' असे म्हणत अधिकाऱ्यांना फोन सुरू केले. बंगल्याचे प्रकरण अंगाशी येणार, हे लक्षात येताच प्रशासनाकडून 'आम्ही कोणालाही बंगला दिलेला नाही,' असे स्पष्ट करण्यात आले.
त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऐनवेळी बैठकीचे ठिकाण पुणे जिल्हा बँकेच्या सभागृहामध्ये ठेवण्याचे ठरले. मात्र, दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे तेथे जेवणासाठी जागा उपलब्ध नव्हती. पुन्हा निरोप देऊन बैठकीचे ठिकाण 'बारामती हॉस्टेल' ठेवण्याचा विचार झाला. अखेर शिवाजीनगर येथील पक्ष कार्यालयात व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे पहिल्याच दिवशी विरोधकांच्या खेळीने सत्ताधाऱ्यांना चार दार घ्यावी लागली अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.