

Dharashiv Dhananjay Sawant Accident News : शिवसेनेची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर परत येत असताना झालेल्या अपघातात माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत हे जखमी झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
सोलापूर-पुणे महामार्गावर बारामतीजवळ काल (बुधवारी) मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. धनंजय सावंत हे आपल्या काही सहकाऱ्यांसोबत फॉर्च्युनर कारमधून जात होते. मध्यरात्री उशिरा बारामतीपासून जवळच असलेल्या भिगवणजवळ त्यांच्या कारला भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिली आहे.
यात कारचं मोठं नुकसान झालं आहे. सुदैवाने सावंत यात सुखरूप बचावले आहेत. धनंजय सावंत यांचे पुत्र आणि चालक व सुरक्षारक्षक किरकोळ जखमी झाले आहेत.हा अपघात इतका भीषण होता की गाडीचा चेंदामेंदा झाला आहे.
धनंजय सावंत यांनी पत्नीसह शिवसेनेचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. काल (बुधवारी) भाजप प्रवेशाचा कार्यक्रम संपल्यानंतर ते आपल्या कारने परत येत होते. भिगवणजवळ सोलापूर-पुणे महामार्गावर मध्यरात्री एकच्या सुमारास भिगवणजवळील डाळज २ गावाच्या हद्दीत आले असता, समोरून येणाऱ्या कंटेनरने (MH 12 WJ 6374) त्यांच्या वाहनाला भीषण धडक दिली.
ही धडक इतकी जोरात होती की त्यांच्या फॉर्च्युनरच्या चालकाच्या बाजूचा पूर्ण भाग चेंदामेंदा झाला. मात्र या भीषण धडकेतून धनंजय सावंत यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. कारचालक आणि सुरक्षारक्षक किरकोळ जखमी झाले असून, त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
" ईश्वराची कृपा, कार्यकर्त्यांचे प्रेम,आणि शुभेच्छा यामुळेच मी आज या भीषण अपघातातून सुखरूप बाहेर आलो आहे. थोड्या किरकोळ जखमा झाल्या असल्या तरी प्रकृती स्थिर आहे, कुणीही काळजी करू नये," अशी प्रतिक्रिया धनंजय सावतं यांनी अपघातानंतर दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.