Ramdas Athavale
Ramdas Athavale Sarkarnama
राज्य

आठवले यांनी विधान बदलले... म्हणाले, महाराजांना गुरूची आवश्यकता नव्हती

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचे गुरू होते. त्यांचे त्यांना मार्गदर्शन होते. ते शिवरायांची प्रेरणा होते. हे खरे असून राज्यपालांच्या विधानाचा विर्पयास करण्यात आला असून राज्यपालांनी (Bhagat Singh Koshyari) माफी मागण्याची आवश्यकता नाही, अशी प्रतिक्रिया केंद्रिय राज्य मंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) येथे दिली होती. त्यांच्या या वक्तव्यावर टीका होताच आठवलेंनी लगेचच आपले विधान बदलले असून छत्रपती शिवाजी महाराज हे स्वयंभू राजे होते. शौर्य आणि धैर्याचे महामेरू होते. त्यांना गुरू ची गरज नव्हती. त्यांच्या खऱ्या गुरू माता जिजाऊ याच होत्या. अन्य कोणी त्यांचा गुरू होऊ शकत नाही, अशी सारवासारव प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

पिंपरीतील सुभेदार रामजी आंबेडकर वसाहतीच्या उभारलेल्या कमानीचे अनावरण त्यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर आठवलेंनी मिडियाशी संवाद साधला. राज्यपालांच्या आक्षेपार्ह विधानावर त्यांना विचारले असता समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू होते. त्यांचे त्यांना मार्गदर्शन होते. ते शिवरायांची प्रेरणा होते. हे खरे असून राज्यपालांच्या विधानाचा विर्पयास करण्यात आल्याने राज्यपालांनी माफी मागण्याची आवश्यकता नाही, असे ते म्हणाले होते. मात्र, या वक्तव्यावरून आपण अडचणीत येऊ हे लक्षात येताच त्यांनी नवीन प्रसिद्धीपत्रक काढत नव्याने स्पष्टीकरण दिले आहे.

आपल्या प्रसिद्धीपत्रकात आठवले म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे स्वयंभू राजे होते. शौर्य आणि धैर्याचे महामेरू होते. त्यांना गुरू ची गरज नव्हती. त्यांच्या खऱ्या गुरू माता जिजाऊ याच होत्या. अन्य कोणी त्यांचा गुरू होऊ शकत नाही. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल हे वक्तव्य केले आहे ते मला माहित नाही त्याबाबत मी लवकरच राज्यपाल यांना भेटून माझे मत सांगणार आहे. समर्थ रामदास स्वामी यांचे स्थान त्यांच्या जागी आहे. मात्र, छत्रपती शिवाजी महाराज यांना कोणत्याही गुरूची आवश्यकता नव्हती. ते स्वयंभू राजे होते. संपूर्ण देशात छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानले जात आहे, असे स्पष्टीकरण आठवलेंनी दिले.

छत्रपती शिवाजी महाराज हे समतेचे तत्व जगणारे राजे होते. त्यांनी सर्व जाती धर्माच्या मावळ्यांना एकत्र करून हिंदवी स्वराज्य उभारले. त्यांचा छत्रपती म्हणून राज्याभिषेक करण्यास महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी नकार दिला त्यानंतर काशीहुन आलेल्या गगभट्टानी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केल्याचा इतिहास सर्वश्रुत आहे, असे आठवलेंनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

दरम्यान, युक्रेन मध्ये अडकलेल्या भारतीयांना देशात परत आणण्यासाठी केंद्र सरकार युद्ध पातळीवर काम करीत आहे. याबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केवळ टीका करू नये. सरकारला सूचना जरूर कराव्यात. एका भारतीय विद्यार्थ्याचा युक्रेन मध्ये मृत्यू झाला ही दुःखद बाब असल्याचेही आठवलेंनी आपल्या प्रसिद्धीपत्रकामध्ये म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT