नितीन राऊत विलासरावांना विसरले नाहीत : त्यांच्या नावाने `वीजबिल अभय योजना`

वीज ग्राहकांसाठी विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांच्या नावाने "विलासराव देशमुख अभय योजना" जाहीर केली.
Nitin Raut, Vilasrao Deshmukh
Nitin Raut, Vilasrao Deshmukhsarkarnama

लोणार (बुलडाणा) : राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी आज (ता. १ मार्च) लोणार येथे थकीत वीजबिल (Electricity Beel) व कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांसाठी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांच्या नावाने "विलासराव देशमुख अभय योजना" जाहीर केली. ही योजना १ मार्च २०२२ ते ३१ मार्च २०२२ पर्यंत लागू असेल, असेही त्यांनी सांगितले.

Nitin Raut, Vilasrao Deshmukh
आंबेडकरांच्या रक्ताच्या वारसदारांनीच दलितांची दिशाभूल केली; राऊतांचा आरोप

या योजनेमुळे राज्यातील बंद पडलेले कृषी, औद्योगिक व घरगुती वीज जोडण्या पुन्हा सुरू होतील. राज्यातील कायमस्वरूपी बंद पडलेले उद्योग, कृषी कनेक्शन सुरू होतील, राज्यात रोजगार निर्माण होऊन राज्याच अर्थचक्र सुरळीत होण्यास मदत होईल, असेही राऊत यांनी सांगितले. राज्यात जवळपास ३ लाख १६ हजार ५०० ग्राहकांच्या वीज पुरवठा कायमस्वरूपी बंद केलेला आहे. अशा ग्राहकांसाठी ही योजना सुरू करण्यात आली असल्याचे राऊत यांनी सांगितले.

राज्यात ९ हजार ३५४ कोटी रुपये थकबाकी असून यामुळे राज्यात वीज मंडळाचे अर्थचक्र थांबल आहे. त्याच बरोबर त्यांनी भाजपवरही जोरदा टिका केली. राज्यात आमच्या सरकारच्या काळात १७ हजार कोटी असलेली थकबाकी भाजपच्या (BJP) काळात ५१ हजार कोटी पर्यंत गेली, असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे आताही थकबाकी ७१ हजार कोटी झाली आहे. कोरोना काळात महावितरणच्या शहिद झालेल्या कर्मचाऱ्यांना आज श्रद्धांजली अर्पण करतो, असेही ते म्हणाले.

Nitin Raut, Vilasrao Deshmukh
नितीन राऊतांनी दिला इशारा; म्हणाले, कामगिरी पाहूनच तिकीट दिले जाईल...

कोरोना (corona) काळात केंद्र सरकारने एक रुपयाही दिला नाही. उलट जादा व्याजदर आकारून मदत देऊ केली असता आम्ही नाकारून खाजगी बँकांकडून कर्ज घेऊन राज्याचा गाडा चालविला. कोरोना काळात आम्ही राज्य अंधारात जाऊ दिले नाही. मात्र, या सर्व गोष्टींना कोल इंडिया जबाबदार असल्याचेही त्यांनी सांगितले. विलासराव देशमुख अभय योजनेत एकरकमी थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांना १०० टक्के व्याज माफी आहे, याचा लाभ ग्राहकांनी घ्यावा, असे आव्हानही राऊत यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com