जालना : गेल्या काही दिवसांपासून कोरोना प्रादुर्भाव (Covid-19) मोठ्या प्रमाणात वाढला असून तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली आहे. या तिसऱ्या लाटेचा (3rd Wave) प्रादुर्भाव कधीपर्यंत राहील हे सांगता येत नाही. मात्र, जानेवारी अखेरपर्यंत ही लाट कायम राहील, असा अंदाज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी आज (ता.10 जानेवारी) व्यक्त केला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी घेतलेल्या कोरोना आढावा बैठकीला ते उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद सा
टोपे म्हणाले, सध्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यांतील शाळा बंद करण्यात आल्या असून विद्यार्थ्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे पालकांनी सरकारला समजून घेऊन सहकार्य करावे व शाळा बंदच राहतील, असे त्यांनी सांगितले. तसेच, राज्यातील अनेक राजकीय नेते कोरोना नियम आणि निर्बंधाच पालन करत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सर्वांनी सहकार्य करून नियम पाळावे व महिनाभर राजकीय पक्षांनी सुद्धा आपापले कार्यक्रम रद्द करावे, असे आवाहन देखील टोपेंनी केले.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा शेवट हा जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता देखील त्यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाल्यानेच निर्बंध लावले असून लोकांची काळजी घेणे गरजेचे आहे. जान है तो जहान है! असे सांगत उद्योग सुरू असलेच पाहिजे पण काळजी घेणेही महत्वाचे आहे, असा टोला त्यांनी सातत्याने महाविकास आघाडी सरकारवर करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलांना लगावला आहे.
आज केद्रींय आरोग्यामंत्री मनसुख मांडवीय यांच्या सोबत झालेल्या बैठकीत राज्यातील कोरोना स्थिती, सद्य उपलब्ध असलेली साधन सामुग्री याबाबत चर्चा झाली असून ECRP 2 चा निधी खर्च करण्याबाबत चर्चा झाली. त्यामुळे आता निधी खर्च करण्याला वेग येईल, असा विश्वासही टोपेंनी व्यक्त केला. राज्यातील नादुरुस्त ऑक्सिजन प्लांट दुरुस्त करून घेण्याच्या सूचना, बूस्टर डोस, लहान मुलांना लसीकरण वेग वाढवण्यासाठी सूचना केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दिल्याचे टोपेंनी यावेळी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.