संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांना कोरोनाची लागण

राजनाथसिंह (Rajnath Singh) यांनी कोरोनाची (Covid-19) लागण झाल्याची माहिती ट्वीट करून दिली आहे.
Rajnath Singh
Rajnath Singh Sarkarnama
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली : देशाचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह (Rajnath Singh) यांनाही कोरोनाची (Covid-19) लागण झाली आहे. सिंग यांची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याबाबत त्यांनीच ट्वीटरच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे. सिंग यांना कोरोनाची सौम्य लक्षणे असून ते यासाठी घरीच उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती सध्या चांगली असल्याची माहिती मिळाली असून त्याच्या संपर्कात आलेल्यांना त्यांनी कोरोना तपासणी करण्याचे आवाहन केले आहे.

Rajnath Singh
महादेव जानकर यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह

राजनाथ सिंहांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून ट्वीट करत दिली आहे. सिंग ट्वीटमध्ये म्हणाले की 'माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मला सौम्य स्वरूपाची लक्षणे आहेत आणि मी होम क्वारंटाइन आहे. 'अलीकडील काही दिवसांत जे माझ्या संपर्कात आले आहेत त्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी आणि विलगीकरणात राहावे', असे आवाहन त्यांनी केले आह

Rajnath Singh
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा संपूर्ण देशाला होतोय असाही फायदा!

दरम्यान, देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झालेली बघायला मिळत आहे. अनेक मंत्री, राजकीय नेतेमंडळी व काही सिलेब्रिटींनाही कोरोनाची लागण झाली आहे. राजधानी दिल्लीत तर करोनाची स्थिती गंभीर बनली असून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही कोरोनाची लागण झाली होती. याबरोबरच महाराष्ट्रात अनेक मंत्री व आमदार खासदारांनाही कोरोनाची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोना रोखण्याठी अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com