Sujat Ambedkar & Amit Thackeray
Sujat Ambedkar & Amit Thackeray Sarkarnama
राज्य

माझा राग अमित ठाकरेंवर नव्हता; पण,...

सरकारनामा ब्यूरो

पुणे : माझा राग हा सरळसरळ अमित ठाकरेंवर (Amit Thackeray) नव्हता आणि नाही. मला राज ठाकरेंनी (Raj Thackeray) एव्हढच सांगायच होत की, ज्या आंदोलनात तुमचा मुलगा उतरत नसेल तर त्या आंदोलनात दुसऱ्यांच्या मुलांनाही उतरवू नका. आणि जर आंदोलन करायचेच असेल तर त्या आंदोलनात तुमच्या मुलालाही त्यांच्या खांद्याला खांदा लावुन उतरवा. कारण अशा आंदोलनात अनेक बहूजन मुले उतरतात आणि त्यानंतर त्यांच्यावर पोलिस केस दाखल होतात यामुळे त्यांना शिक्षण घेतांना व नोकरी करतांना अडचणी येतात, असे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचे पुत्र सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar ) यांनी 'सरकारनामा'ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये व्यक्त केले.

मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुडीपाडव्याच्या मेळाव्यात मशिदींवर लागलेले भोंगे उतरवावेच लागतील, असे म्हटले होते. भोंगे काढले नाही तर मशिदींसमोर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावू, असा इशाराही दिला होता. मात्र, राज यांच्या या घोषणेवर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकरांनी टीका केली होती. मशिदींसमोर भोंगे लावून हनुमान चालिसा म्हणण्यासाठी तुमच्या मुलाला म्हणजे अमित ठाकरेंना पाठवा, असे थेट आव्हान केले होते. यावर मनसे पदाधिकाऱ्यांकडून सुजात यांच्यावर टीका करण्यात आली होती. यावर सुजात यांनी 'सरकारनामा'ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्टीकरण दिले असून आपली बाजू मांडली आहे.

सुजात म्हणाले, राज ठाकरे आणि बाळासाहेब (डॅा. प्रकाश आंबेडकर) यांच्या आंदोलनाच्या पद्धतीमध्ये मोठा फरक दिसतो आणि यावरच माझा खरा सवाल होता. बाळासाहेब जेव्हा आंदोलन करतात तेव्हा त्यांना वाटले की, मी त्या आंदोलनात उतरू नये तर ते इतरांच्या पोरांनाही त्या आंदोलनात उतरवत नाहीत. ते नेहमीच वंचित घटकांना वाचवण्याचा प्रयत्न करतात. बाळासाहेबांनी आतापर्यंत जी आंदोलनं केली त्यापैकी गोविंद पानसरे, गौरी लंकेश, नरेंद्र दाभोळकर, एम.एम कलबुर्गी यांच्या हत्तेनंतर जे आंदोलन झाले त्या व कोरेगाव भिमा येथील विजय स्तंभावर झालेल्या हल्ल्यानंतर पुकारण्यात आलेल्या संप असो किंवा एनआरसीसी कायद्यासंदर्भात केलेल्या आंदोलनात मी स्वत: सहभागी होतो. माझा राज ठाकरेंना हाच प्रश्न होता आणि आहे की, ज्या आंदोलनात तुमचा मुलगा तुम्ही उतरवच नसाल तर त्यात तुम्ही दुसऱ्यांच्या मुलांना का उतरवता? अशा आंदोलनात बहूतांश बहूजन मुलेच भरडले जातात. त्यांच्यावर पोलिस कारवाई होतात. यामुळे त्यांना समोर शिक्षण आणि नोकरीसाठी अडचणा येतात. यावर माझा अक्षेप आहे, अशा शब्दात सुजात यांनी राज ठाकरेंना सुनावले.

दंग्यामागे ब्राम्णनांचा हात असतो असे कुठल्या आधारावर आपण म्हणता, असा प्रश्न मुलाखती दरम्यान 'सरकारनामा' प्रतिनिधीने सुजात यांना विचारला असता त्यांनी यावरही आपले स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, आतापर्यंत देशात जे आंदोलन झाली त्यावरून आपण हा आरोप केला आहे. बाबरी मशिद प्रकरणी भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी रथ यात्रा काढत लोकांना भडकावले तर कोरेगाव भिमा येथील विजयस्तंभाजवळ झालेल्या दंगलीमध्ये मनोहर भिडे आणि मिलिंद एकबोटेंनी हे प्रकरण घडवल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच माझ्या बोलण्यावर कुणाला अक्षेप असेल तर त्यांनी चिथावणीखोर वक्तव्य देशात कोण करतात हे जाणून घ्यायचे असल्यास त्यांनी इंटरनेटवर माहिती घ्यावी, असे आव्हानही सुजात यांनी केले.

दरम्यान, मुलाखती दरम्यान त्यांनी अनेक विषयावर आपले मत सडेतोडपणे मांडले. आपण राजकारणात निवडणूकीला बहूतेक उभेच राहणार नसल्याचे सुजात यांनी सांगितले. मात्र, वंचित बहूजन आघाडीला राज्यात वाढवण्यासाठी आणि वंचितांना न्याय देण्यासाठी माझ्या वतीने योगदान देणार असल्याचे स्पष्ट केले. त्याचबरोबर मी वंचितचा अधिकृत पदाधिकारी नसल्याने युती किंवा आघाडीबाबत जास्त भाष्य करणार नसल्याचे सांगितले. तर ज्यांना वंचितचे विचार पटत असतील त्या आंबेडकरवादी संघटनांचे वंचित बहूजन आघाडीमध्ये स्वागत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT