<div class="paragraphs"><p>vidhan Bhavan</p></div>

vidhan Bhavan

 

Sarkarnama

राज्य

विधानसभेतील काही आमदार पुन्हा गॅलरीत, तर पीए पार्किंगमध्ये!

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : राज्य विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Winter Session) बुधवारपासून (ता.22 डिसेंबर) मुंबईत सुरू होत आहे.`ओमीक्रॉनॅल`या कोरोनाच्या (Covid-19) नव्या उत्परिवर्तीत विषाणूच्या धास्तीने या ही अधिवेशनात अभ्यांगतांना प्रवेश नसणार आहे. तर, सामाजिक अंतर राखून (एक आसन सोडून) सदस्यांना बसायची व्यवस्था गेल्या वर्षाप्रमाणेच करण्यात आली आहे. त्यामुळे विधानसभेतील काही आमदारांना (MLA) पुन्हा गतवेळसारखे सभागृहाच्या गॅलरीत बसून कामकाजात भाग घ्यावा लागणार आहे. तर, त्यांचे पीए तथा स्वीय सहायकांच्या बसण्याची व्यवस्था विधानभवनासमोरील वाहनतळ आवारात मंडप टाकून करण्यात आली आहे. मंत्र्यांच्या कर्मचाऱ्यांना अत्यंत मर्यादित प्रवेश दिला जाणार आहे.

हिवाळी अधिवेशन हे राज्याची उपराजधानी नागपूर येथे भरते. मात्र, कोरोनामुळे या प्रथेला ब्रेक लावला. त्यामुळे ते यंदा मुंबईतच होत आहे. त्यासाठी लसीचे दोन्ही डोस आणि त्याबरोबर आरटी-पीसीआर चाचणी निगेटीव्ह असलेल्यांनाच विधानभवनात प्रवेश दिला जाणार आहे. दरम्यान, अधिवेशनाशी सबंधित आमदार, अधिकारी व कर्मचारी आदी दोन हजार 678 जणांची आरटी-पीसीआर चाचणी सोमवारी (ता.20 डिसेंबर) करण्यात आली. त्यात आठ कोरोना पॉझीटीव्ह सापडले.

आऱटीपीसीआरसह सुरक्षा, कोविड प्रतिबंधात्मक कार्यवाही, सभागृहातील आसन व्यवस्था, अग्निसुरक्षा, उपहारगृह या उपाययोजनांसंदर्भात विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि विधानपरिषदेच्या उप-सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उच्चस्तरीय बैठकीत आढावा घेतला. ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना यावेळी नाईक-निंबाळकर यांनी दिल्या. विधानपरिषदेच्या

सभागृहामध्ये आसन व्यवस्था पुरेशी असल्यामुळे सामाजिक अंतर राखूनही तेथील सर्व सदस्यांना गॅलरी नाही, तर सभागृहात खालीच बसता येणार विधानसभा, विधानपरिषद व मध्यवर्ती सभागृहामध्ये निगेटिव्ह प्रेशर यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT