Madhav Bhandari & Rajesh Tope Sarkarnama
राज्य

सरकारने काळया यादीत टाकलेल्या कंपनीला राजेश टोपे यांनी कंत्राट का दिले?

आज (ता.24 ऑक्टोबर) झालेल्या आरोग्य विभागाच्या परीक्षेच्या गोंधळाला आरोग्यमंत्री टोपे (Rajesh Tope) हेच जबाबदार असल्याने त्यांनी राजीनामा द्यावा, अशी भाजपने (BJP) केली आहे.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : आरोग्य विभागाच्या (Department of Health) रविवारी आज (ता.24ऑक्टोबर) झालेल्या परीक्षेत तिसऱ्यांदा गोंधळ उडाल्याने अनेक विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप करावा लागला. या गोंधळाला आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) हेच जबाबदार असून या गोंधळाची जबाबदारी स्वीकारत मंत्री टोपे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे (BJP) प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी (Madhav Bhandari) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

भंडारी यांनी पत्रकात म्हटले की, आरोग्य विभागातर्फे मागील परीक्षा घेण्याचे कंत्राट न्यासा कंपनीला देण्यात आले होते. या कंपनीने केलेल्या गोंधळामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की राज्य सरकारवर आली होती. उत्तर प्रदेश सरकारने (UP Government) आणि राज्यातील महविकास आघाडी सरकारनेही या कंपनीला काळया यादीत टाकले होते. मात्र, आरोग्य मंत्री टोपे यांच्या आग्रहामुळेच या कंपनीला आज (ता.24ऑक्टोबर) झालेल्या परीक्षाचे कंत्राट देण्यात आले होते. त्यामुळे आज झालेल्या गोंधळाला आरोग्यमंत्री टोपे हेच जबाबदार असल्याने त्यांनी राजीनामा द्यावा, अशी भाजपाची मागणी आहे.

परीक्षेवेळी अनेक ठिकाणी उडाला गोंधळ!

भंडारी म्हणाले, आज झालेल्या झालेल्या परीक्षेवेळी अनेक ठिकाणी गोंधळ उडाला आहे. अनेक विद्यार्थ्यांना वेळेवर प्रश्नपत्रिकाच मिळाल्या नसल्याचे उघड झाले आहे. उमेदवारांच्या आसन व्यवस्थेमध्येही गोंधळ उडाल्याच्या घटनाही घडल्या. मुंबई, पुणे, नाशिक या केंद्रांवर परीक्षेवेळी गोंधळ झाल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. काही विद्यार्थ्यांना सकाळच्या परीक्षेसाठी एक केंद्र तर, दुपारच्या परीक्षेसाठी दुसऱ्या जिल्ह्यातील केंद्र दिले गेले. तसेच, नाशिक येथे खासगी वाहनांतून प्रश्नपत्रिका आणल्या गेल्याचीही तक्रार आहे. या परीक्षा प्रक्रियेबाबत संशय व्यक्त होत असल्याने परीक्षा नव्याने घेण्यात याव्या अशी मागणी त्यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT