राजेश टोपे तुरूंगात जाणार; गोपीचंद पडळकरांचा खळबळजनक दावा

भाजप नेत्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना सतत लक्ष्य केलं जात आहे.
Gopichand Padalkar and Rajesh Tope
Gopichand Padalkar and Rajesh TopeSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : मागील काही महिन्यांपासून भाजप (BJP) नेत्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) मंत्र्यांना सतत लक्ष्य केलं जात आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh), एकनाथ खडसे (Eknath Khadse), हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नातेवाईकांची प्राप्तीकर विभागाकडून चौकशी कऱण्यात आली आहे. आता राष्ट्रवादीतील आणखी एका मंत्र्याबाबत भाजपनं भाकित केलं आहे.

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे भविष्यात तुरूंगात जातील, असं भाकित केलं आहे. आरोग्य विभागाच्या परिक्षेतील घोळावरून त्यांनी टोपेंवर जोरदार टीका केली आहे. शनिवारी एका सभेत बोलताना पडळकर म्हणाले, कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका. आरोग्य विभागाची परीक्षा होणारच, असं टोपे सकाळी सांगतात. परीक्षार्थी मुलं परीक्षेसाठी आदल्या रात्रीच ठिकठिकाणी पोहचतात आणि रात्री दहा वाजता आरोग्य मंत्री म्हणतात, परीक्षा रद्द करण्यात आली आहे.

Gopichand Padalkar and Rajesh Tope
काय सांगता! सरकारी कर्मचाऱ्यांना देणार स्मार्ट वॉच; हालचाली होणार ट्रॅक

या सरकालला लाज वाटायला हवी. मुलांच्या, गरीबांच्या भावनेशी खेळत आहेत. परीक्षा पुन्हा 24 तारखेला घेण्याचे जाहीर केले. पण अनेकांचे हॉल तिकीट निघत नाही. भविष्यात राजेश टोपे आर्थर रोड जेलमध्ये जातील, असं त्यांचं एकंदरीत वागणं दिसतंय. कारण साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायचं म्हटल्यावर त्यांना हे उद्योग करावे लागतात. पण अनिल देशमुखांचा चेहरा डोळ्यासमोर ठेवून तरी या मंत्र्यांनी काम करावं, असा टोलाही पडळकरांनी लगावला.

भाजप प्रदेश उपाध्यक्षांना वाटते नाना पटोलेंची भीती

अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानवर (Aryan Khan) नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) केलेली कारवाई म्हणजे भाजपकडून (BJP) हिंदू-मुस्लीम (Hindu-Muslim) ध्रुवीकरणाचा कट शिजत असल्याचे असल्याचे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केलं होतं. या वक्तव्याला बुलडाण्याचे जळगाव जामोद विधानसभा मतदार संघाचे भाजपाचे आमदार व माजी कामगार मंत्री विद्यमान प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संजय कुटे (Sanjay Kute) यांना भीती वाटू लागल्याची चर्चा सध्या बुलढाण्याच्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

Gopichand Padalkar and Rajesh Tope
कलम 370 हटल्यानंतर पहिल्याच काश्मीर दौऱ्यात शहांनी केली मोठी घोषणा

बुलडाण्यात भाजपाच्या पदाधिकारी प्रशिक्षण मेळाव्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कुटे म्हणाले की, एनसीबीने आर्यन खानवर केलेली कारवाई म्हणजे भाजपाकडून मुस्लिम तुष्टीकरणाचा कट शिजत असल्याचं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं, पण असं व्यक्तव्य करणं अतिशय दुर्दैवी असून हे वक्तव्य त्यांची प्रवृत्ती दाखवून देणार वक्तव्य आहे. मुस्लिमांना भाजपच्या विरोधात करण्याचा हा प्रयत्न असून आपण पुन्हा सत्तेत येणार नाही, या भीतीपोटी त्यांनी अस वक्तव्य करत मुस्लिमांच तुष्टीकरणाचा प्रयत्न केला आहे. हे वक्तव्य महाराष्ट्राला न शोभणारे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com