Devendra Fadnavis & Nawab Malik
Devendra Fadnavis & Nawab Malik  Sarkarnama
राज्य

पवारांनी फडणविसांना `कात्रजचा घाट` दाखवलाय, आता काशीचाही दाखवतील

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : पवारसाहेबांवर बोलणार्‍या फडणवीसांना यापूर्वी कात्रजचा घाट दाखवला होता आणि आताही बोलत राहिले तर पवारसाहेब काशीचा घाट दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस हा साडेतीन जिल्हयाचा पक्ष असून पश्चिम महाराष्ट्रापूरता मर्यादीत असलेला पक्ष, अशी टीका विधानसभेतील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर केला होता. त्यांच्या या टीकेवर मलिक यांनी फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

मलिक म्हणाले, पवारसाहेब मुख्यमंत्री असताना फडणवीस कधी विधानसभेत सदस्य म्हणून निवडून आले नाहीत. कालपर्यंत राज्यात त्यांच्या पक्षाच्या २५-३० जागा निवडून येत होत्या ते पवारसाहेबांवर भाष्य करत आहेत. राज्यातील इतर जिल्ह्यात निवडून आलेले आमदार खासदार हे कुठल्या जिल्ह्यातील आहेत हे फडणवीसांनी सांगावे. याअगोदरही फडणवीस त्यांच्यावर भाष्य करत होते. त्यावेळी काय झाले याची आठवणही त्यांनी फडणवीसांना करून दिली.

फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व पवार यांच्यावर टीका करतांना राष्ट्रवादी हा पक्ष साडेतीन जिल्हयाचा पक्ष व पश्चिम महाराष्ट्रापर्यंत मर्यादीत असलेला पक्ष आहे, अशा शब्दात टीका केली होती. त्यांच्या या टीकेवरून राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून फडणवीसांवर चांगलाच हल्लाबोल केला जात आहे. दरम्यान, पुण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी तर फडणवीसांना पवार साहेबांसारख्या पात्रतेचा विचार करायलाही दुसरा जन्म घ्यावा लागेल, अश्या शब्दात टीका केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT