Nawab Malik, Praveen Darekar

 

Sarkarnama

राज्य

प्रवीण दरेकर विरुद्ध नवाब मलिक अशी जुंपली की सभापतींना समज द्यावी लागली..

विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचे (Assembly Winter Session) कामकाज आजपासून सुरु झाले आहे.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : विधीमंडळ अधिवेशनाच्या (Assembly Winter Session) पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी होत आहे. आज (ता.22 डिसेंबर) विधीमंडळात मजूर प्रश्नावरुन राष्ट्रवादीचे (NCP) नेते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) व विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक बघायला मिळाली आहे.

मलिक म्हणाले, आपण इथे निवडून येत असताना शपथेवर माहिती देतो. मला सांगा दरेकरांनी जर 2016 साली शपथ पत्र सादर केले. त्यात 9 लाख 20 हजार इन्कम दाखवले. मात्र, यांच्याकडे 11 कोटी संपत्ती आहे. हे मजूर संस्थेकडून निवडणूक लढवत आहेत त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा, असा त्यांनी प्रश्न उपस्थित केला. यावर दरेकर म्हणाले की, आज राज्यात शेतकरी नाही तो शेतकरी झाला आहे. जो माथाडी नाही तो माथाडी झाला आहे. या विषयावर एक विशेष चर्चा घ्या. माझे त्याला पूर्ण समर्थन आहे. यावर मलिकांनी मला चर्चा घ्यायला काही हरकत नाही. मात्र, जे मजूर नाहीत ते कसे निवडणूक लढवत आहेत, असा हल्लाबोल केला व दरेकर खोटे बोलत असल्याचे ते म्हणाले.

यानंतर दरेकरांनी मलिकांना उत्तर देतांनी म्हणाले, नवाब मलिक सारख्या खोट्या माणसाने प्रमाणपत्र देऊ नये. राष्ट्रवादीत असे किती मजूर आहेत त्यांची यादी मी दोन दिवसात देतो. मी मलिकांवर दावा ठोकलेला आहे. त्यांना फक्त बोलावे लागत आहे म्हणून ते बोलतात, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

यानंतर अनिल परबांनी झालेल्या बाचाबाचीमधील हे शब्द कामकाजाच्या पटलावरून काढून टाकावे व नेत्याबाबत अपशब्द वापरू नये, अशी सभापतींकडे विनंती केली. यावर सभापतींनी नेत्यांना समज दिल व पुढील कामकाज सुरू केले.

दरम्यान, आरोग्य विभागाच्या परिक्षेबाबत सरकारला विचारणा केली पण अत्यंत तकलादू उत्तर देण्यात आल्याचे दरेकर म्हणाले. न्यासा कंपनीचे समर्थन करणारे उत्तर सरकारकडून देण्यात आले आहे. न्यासा ब्लॅक लिस्टमध्ये असताना तिला पात्र करून काम दिले गेले आहे. अनेक अधिकारी दलालाना अटक केली तरी, सरकार म्हणतेय आम्हाला माहिती द्या. उत्तर द्यायचे नसेल तर, तुम्ही त्या दलालांना पाठीशी घालण्याचे काम करत आहात. हा जो घोटाळा झाला त्यात अनेक लोकांचा सहभाग आहे. त्याचे धागेदोरे मंत्रालयापर्यत पोहोचलेले आहे. हे सर्व रॅकेट चालवत आहेत. पण सरकारला या दलालांची बाजू घ्यायची आहे. म्हणून आम्ही आज आक्रमकपणे भूमिका घेतली आहे. या सरकारमध्ये कुठल्याही प्रकारचा समन्वय नसल्याचा घणाघात दरेकरांनी सरकारवर केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT