चंद्रकांतदादा तुमची किव येते, अमृता फडणवीसांना विरोधी पक्षनेत्या करणार का?

चंद्रकांत दादा हे भाजपाचे मोठे नेते आहेत. मात्र, त्यांची किव येते. त्यांच्याबाबत बोलणे योग्य होणार नाही. भाजपाचे नेते महिलांबाबत सातत्याने आक्षेपार्ह बोलत आहेत.
Chandrakant Patil, Kishori Pednekar

Chandrakant Patil, Kishori Pednekar

sarkarnama

Published on
Updated on

मुंबई : हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरवात झाली. अधिवेशन सुरु होण्यापूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विधानभवनाबाहेर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची प्रकृती बरी नसल्यामुळे कारभार सांभाळता येत नसेल तर त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा चार्ज रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) किंवा आदित्य ठाकरे यांच्याकडे सोपवावा, असा सल्ला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. याला मुंबईच्या महापैार किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी उत्तर दिलं आहे.

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, "'परंपरा आणि नियमानुसार कोणाला तरी चार्ज द्यावा लागतो. अन्य दोन पक्षांबद्दल त्यांचा अविश्वास स्वाभाविक आहे. कारण त्यांनी घेतला चार्ज तर ते सोडणारच नाहीत. पण त्यांच्या पार्टीमध्येही कोणावर विश्वास नसेल तर त्यांनी आदित्य ठाकरेंकडे चार्ज द्यायला पाहिजे. आदित्य ठाकरेंवरही विश्वास नसेल तर रश्मी ठाकरेंकडे चार्ज द्यावा,"

चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर पेडणेकर चांगल्याच संतापल्या. त्या म्हणाल्या की,चंद्रकांत दादा हे भाजपाचे मोठे नेते आहेत. मात्र, त्यांची किव येते. त्यांच्याबाबत बोलणे योग्य होणार नाही. भाजपाचे नेते महिलांबाबत सातत्याने आक्षेपार्ह बोलत आहेत. ही हिंदू धर्माची शिकवण नाही. रश्मी ठाकरे कधीच राजकारणात पडत नाहीत. त्यांच्यावर टीका करणे योग्य नाही,''

<div class="paragraphs"><p>Chandrakant Patil,&nbsp;Kishori Pednekar</p></div>
भाईंना पाहून नानांनी केली मान वाकडी ; कॉग्रेसमधील मतभेद चव्हाट्यावर

''रश्मी ठाकरेंबाबत काहीही बोलणे खपवून घेतले जाणार नाही. जर भाजपाचे नेते वारंवार असेच वक्तव्य करणार असेल तर आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घ्यावी लागेल. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांना तुम्ही विरोधी पक्षनेत्या करणार का?'' असा टोला किशोरी पेडणेकर यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला.

''अमृता फडणवीस या अधिक चर्चेत असतात. रश्मी ठाकरे या कधीही राजकीय चर्चेत नसतात असे असतानाही त्यांचे नाव घेतात. तुम्हाला कळतंय का स्त्रियांचे किती हनन करणार आणि तुम्ही सांगता आदर करतो. एकवेळ आदित्य ठाकरेंचे नाव घेतलं तर ठीक आहे कारण ते मंत्री आहेत,'' असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com