Chhatrapati Shivaji Maharaj Fort
Chhatrapati Shivaji Maharaj Fort Sarkarnama
राज्य

आदित्य ठाकरे आता `रायगड`मध्ये तर उदय सामंत `रत्नसिंधू`त

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : महाराष्ट्र राज्य मंत्रीमंडळातील सर्व मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यांना (ministers' bungalows) आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पराक्रमी गड आणि किल्ल्यांचे नावे देण्यात येणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयानुसार पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या (Aditya Thackeray) 6 बंगल्याला स्वराज्याची राजधानी 'किल्ले रायगड'चे नाव देण्यात आले आहे.

यासाठी राज्यातील शिवप्रेमींनी सातत्याने पाठपुरवठा केला होता. त्यांनी या संदर्भात उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्याकडे प्रस्ताव दिला होता. सामंत यांनी या प्रस्तावावर सकारात्मक पाठपुरवठा करत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मंजुरीनंतर मंत्र्यांच्या शासकिय निवास्थानांचे नामांतर करण्यात आले. त्यामुळे आता मंत्र्यांच्या शासकिय निवास्थानांना राज्यातील प्रसिद्ध गड आणि किल्यांचे नाव मिळणार आहेत.

याबाबत उदय सामंत म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून मंत्रालयांच्या समोरील बंगल्याना गडकिल्यांची नावे असावी यासाठी शिवप्रेमी संघटना आणि शिवप्रेमी प्रयत्न करत होते. याच पार्श्‍वभूमीवर मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि चव्हाण यांची भेट घेतली होती. सांगताना आनंद होतोय की, आजपासून सर्व मंत्र्यांची बंगले हे गड-किल्ल्यांच्या नावाने ओळखली जातील. ठाकरे आणि चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नावे बदलण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने मी सरकारचे अभिनंदन करतो. शिवप्रेमींची मागणी मान्य झाली त्याबद्दल समाधान व्यक्त करतो, अशी सामंत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. सामंत यांच्या इ 2 बंगल्याला 'रत्नसिंधु' असे नाव देण्यात आले आहे.

अशी दिली मंत्र्यांच्या बंगल्यांना गडकिल्ल्यांची नावे

पूर्वीची नावे आणि आताची नावे

  • अ-3 शिवगड

  • अ-4 राजगड

  • अ-5 प्रतापगड

  • अ-6 रायगड

  • अ-9 लोहगड

  • ब-1 सिंहगड

  • ब-2 रत्नसिंधु

  • ब-3 जंजिरा

  • ब-4 पावनगड

  • ब-5 विजयदुर्ग

  • ब-6 सिद्धगड

  • ब-7 पन्हाळगड

  • क-1 सुवर्णगड

  • क-2 ब्रम्हगिरी

  • क-3 पुरंदर

  • क-4 शिवालय

  • क-5 अजिंक्यतारा

  • क-6 प्रचितगड

  • क-7 जयगड

  • क-8 विशाळगड

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT