Ramdas Athavale
Ramdas Athavale Sarkarnama
राज्य

आठवले म्हणाले, रामदासस्वामी हे शिवरायांचे गुरुच; कोश्यारींनी माफी मागायची गरज नाही..

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) एकेरी उल्लेख करीत रामदासस्वामी (Ramdas Swami) हेच त्यांचे गुरु असल्याचे ठसविण्याचा प्रयत्न राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी नुकताच (ता.२७ फेब्रुवारी) औरंगाबाद येथे केला. त्यांच्या या आक्षेपार्ह वक्तव्याचे राज्यभर तीव्र पडसाद उमटत आहेत.

पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri -Chinchwad) राष्ट्रवादी कॉंग्रेसने (NCP) हे वक्तव्य मागे घेण्याची मागणी काल (ता.२८ फेब्रुवारी) केली. तर, शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडने राज्यपालांच्या प्रतिमेला जोडे मारून आपला निषेध नोंदवला. मात्र, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचे आज (ता.१ मार्च) पिंपरी-चिंचवडमध्ये नुसते समर्थनच केले नाही, तर समर्थ रामदास स्वामी हे शिवरायांचे खरे गुरु, मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान असल्याचे सांगून पुन्हा खळबळ उडवून दिली. त्यामुळे हा वाद आणखी पेटण्याची चिन्हे आहेत.

पिंपरी-चिंचवड पालिकेने २५ लाख रुपये खर्चून पिंपरीतील सुभेदार रामजी आंबेडकर वसाहतीच्या उभारलेल्या कमानीचे अनावरण केल्यानंतर आठवले मिडियाशी बोलत होते. यावेळी राज्यपालांच्या आक्षेपार्ह विधानाविषयी विचारले असता समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू होते. त्यांचे त्यांना मार्गदर्शन होते. ते शिवरायांची प्रेरणा होते. हे खरे आहे, असे आठवले म्हणाले. तसेच राज्यपालांच्या विधानाचा विर्पयास करण्यात आला असल्याने राज्यपालांनी माफी मागण्याची आवश्यकता नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, कमानीच्या उदघाटन कार्यक्रमात बोलताना आठवले यांनी आगामी पालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला चांगल्या जागा देण्याची मागणी भाजपकडे केली. त्यातून या निवडणुकीतही आऱपीआयची भाजपबरोबर युती राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच पुन्हा पालिकेत भाजपचीच सत्ता येणार असल्याचा दावा करीत उपमहापौरपदावर त्यांनी आताच क्लेम केला. पुण्याप्रमाणे पिंपरीतही हे पद आरपीआयला देण्याची मागणी त्यांनी केली. ही निवडणूक एप्रिलच्या शेवटास वा मे मध्ये होऊ शकते. तसेच ती काही महिने पुढेही जाण्याची शक्यता आहे, असे सांगत आपण मात्र त्यासाठी तयारीत राहिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT