Ashish Shelar
Ashish Shelar Sarkarnama
राज्य

अधिका-यांना इंग्रजीची मुभा देणार का?, शेलारांचा सवाल...

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्था आणि प्राधिकरणे यांचा कारभार मराठीतूनच झाला पाहिजे या कायद्याला पाठींबा देताना या विधेयकावर बोलताना भाजप (BJP) आमदार ॲड आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी जनतेला मराठीतून कामकाज (Marathi Language) करण्याची सक्ति आणि अधिका-यांना इंग्रजीची मुभा असा दुजाभाव करणा-या तरतुदी असल्याकडे लक्षवेधत शेलार यांनी सुधारणा सुचविल्या.

विधानसभेत आज (ता. 24 मार्च) महाराष्ट्र राज्यातील स्थानिक प्राकिरणांच्या शासकीय प्रयोजनांसाठी मराठी भाषेचा वापर करण्यासाठी तरतूद करण्यासाठी विधेयक (marathi rajbhasha bill) एकमताने मंजूर करण्यात आले. या विधेयकावर बोलताना शेलार यांनी सरकारने सुचविलेल्या तरतुदींमधील विसंगती शासनाच्या लक्षात आणून दिली. सर्व सरकारी, महापालिका कार्यालयात कामकाजाची भाषा मराठी असेल पण यात शासकीय प्रयोजनासाठी इंग्रजीचा वापर करण्याची मुभा देण्यात आली आहे. याचा अर्थ सर्वसामान्य नागरिकांना मराठीची अनिवार्य आणि अधिका-यांना इंग्रजीची मुभा अशी तरतूद केली जाते का? असा सवाल शेलारांनी केला. पण त्याला उत्तर देताना मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी या तरतुदीचा असा अर्थ घेता येणार नाही सर्वांना कारभार मराठी भाषेतूनच करावा लागेल मात्र विविध देशांच्या दुतावासा सारख्या ठिकाणी पत्रव्यवहार करायचा असेल तीथे इंग्रजीचा वापर करता येईल, असे देसाई यांनी स्पष्ट केले.

या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी तसेच याबाबत ज्या तक्रारी केल्या जातील त्याच्या निवरणासाठी जिल्हा मराठी भाषा समिती असेल, अशी तरतुद या कायद्यात करण्यात आली आहे. याबाबत हरकत घेताना शेलार म्हणाले की, या कायद्याची अंमलबजावणी प्रभावी पणे झाली पाहिजे याबाबत आमच्या मनात शंका नाही. तसेच हा कायदा झाला पाहिजे ही आमचीही भूमिका आहे. मात्र जिल्हा समितीला तक्रार निवारण व कारवाई करण्याचे अमर्याद अधिकार दिले गेले तर प्रशासकीय पातळीवर त्याचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा पतळीवर अशा समिती गठीत करण्यापेक्षा ज्या पध्दतीन प्रत्येक कार्यालयात महिलांच्या सुरक्षेसाठी समिती गठीत केली जाते त्याप्रमाणे प्रत्येक कार्यालयात मराठी भाषेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व त्याबाबत येणा-या तक्रार निवारणासाठी समिती असावी, अशी सूचना शेलारांनी केली. या चर्चेत भाजपा आमदार योगेश सागर, राहुल नार्वेकर यांनीही भाग घेतला. सदस्यांनी केलेल्या सुचनांची दखल घेत मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी दिलेल्या उत्तरानंतर हा कायदा एकमताने मंजूर करण्यात आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT