Political Events on 24 September : इतिहासाची पुनरावृत्ती होते असं म्हणतात ते अगदीच खोटं नाही....निवडणुका आल्या की एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न, आपणच मोठे आहोत हे दाखविण्याचे प्रयत्न प्रत्येक निवडणुकीत युती-आघाड्यांमध्ये होतातच.
या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीसाठी अधून-मधून चर्चा सुरु असते ती कोण मुख्यमंत्री होणार याची. आज महायुती आणि महाविकास आघाडीबाबतही ही चर्चा सुरु आहे. काही वेळा नेते आपल्याच पक्षाला मुख्यमंत्री पद हवे हे जाहीर बोलून दाखवतात. तर कधी 'आधी जिंकणे हे उद्दीष्ट. मुख्यमंत्री पदाचे नंतर पाहू'...अशी भाषा करतात. मात्र, मुख्यमंत्री पदाची आस प्रत्येकालाच असते हे खरे.
२०१४ च्या विधानसभेच्या निवडणुकीतही असेच काहीसे चित्र होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद हवे होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यावरुन छुपा संघर्ष असतानाच दुसऱ्याबाजूला शिवसेना भाजपमध्येही फारसे आलबेल नव्हते. त्यांच्यात जागा वाटपावरून वाद सुरु होते. २४ सप्टेंबर, २०१४ रोजीच्या 'सकाळ'मधले हे मथळे त्यावेळची परिस्थिती अचूक दाखवतात....
दिनविशेष - 24 सप्टेंबर
1887 : दुसऱ्या महायुद्धकाळातील भारताचे ब्रिटिश व्हाईसरॉय लॉर्ड व्हिक्टर अलेक्झांडर जॉन होप लिनलिथगो यांचा जन्म.
1932 : दलितांना स्वतंत्र मतदारसंघाऐवजी सर्व प्रांतांमध्ये सर्वसाधारण मतदारसंघात लोकसंख्येच्या प्रमाणात जागा द्याव्यात, असा प्रमुख राजकीय नेत्यांमध्ये करार झाला. त्यावर महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पं. मदनमोहन मालवीय, बॅ. मुकुंदराव जयकर आदींच्या सह्या आहेत. हा करार "पुणे करार' या नावाने ओळखला जातो.
1998 : "सॅटनिक व्हर्सेस' या कादंबरीमुळे गाजलेले लेखक सलमान रश्दी यांच्या विरुद्धचा मृत्युदंडाचा फतवा मागे घेतल्याचे इराण सरकारने जाहीर केले.
1999 : कैगा अणुऊर्जा प्रकल्पातील 220 मेगावॉट क्षमतेचे अणुभट्टी क्रमांक दोन कार्यान्वित. कैगा येथील अणुभट्टीच्या कार्यान्वयाने कर्नाटकातील अणुऊर्जा निर्मितीच्या युगाला सुरवात.
2002 : गांधीनगरच्या प्रसिद्ध स्वामीनारायण (अक्षरधाम) मंदिरात तीन ते चार सशस्त्र दहशतवाद्यांच्या टोळीने केलेल्या हल्ल्यात आणि बेछूट गोळीबारात किमान 44 भाविक मृत्युमुखी पडले तर किमान शंभर जण जखमी झाले.
2004 : देशाच्या अणुतंत्रज्ञान क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ. राजा रामण्णा यांचे निधन .
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.