23 September in History : 'ती' भाजप शिवसेनेच्या मनभेदाची सुरुवात होती?

23 September 2024 Dinvishesh : राष्ट्रवादीमध्ये असलेले संजय सावकारे हे एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचेही वृत्त त्या दिवशी प्रसिद्ध झाले होते... काय ते वृत्त...
23 September in History Dinvishesh
23 September in History DinvisheshSarkarnama
Published on
Updated on

Political Events on 23 September: राज्यात पुन्हा विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. गेल्या पाच वर्षांत खूप पाणी पुलाखालून वाहून गेलं. शिवसेनेचे दोन भाग पडले तसे राष्ट्रवादी काँग्रेसचेही. आता तीन पक्षांची महायुती आणि तीन पक्षांची महाविकास आघाडी यांच्यात राजकीय बुद्धीबळ सुरु आहे.

स्व. शिवसेना प्रमुख हयात असताना भाजप-शिवसेना युती अखंड होती. स्व. प्रमोद महाजनांसारखे नेते या युतीत दरी पडणार नाही, याची काळजी घ्यायला भक्कम होते. पण नंतर राजकारणच बदललं. 2012 मध्ये बाळासाहेबांचं निधन झालं. याच काळात शिवसेनेची महत्त्वाकांक्षा वाढत असल्याचे तेव्हाच्या बातम्यांवरुन दिसते.

2014 मध्ये भाजप-शिवसेना यांच्यात मनभेद सुरु झाल्याचे तेव्हाच्या बातम्यांवरुन दिसते. दहा वर्षांपूर्वी म्हणजेच 23 सप्टेंबर 2014 रोजी प्रसिद्ध झालेल्या 'सकाळ'मधली मुख्य बातमी हीच होती....पूर्वी राष्ट्रवादी मध्ये असलेले संजय सावकारे हे एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचेही वृत्त त्या दिवशी प्रसिद्ध झाले होते....काय होत्या या दोन बातम्या......

22 September 2024 dinvishesh
22 September 2024 dinvishesh sarkarnama

दिनविशेष - 23 सप्टेंबर

1873 : महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.

1884 : महात्मा फुले यांचे सहकारी रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी "बॉंबे मिल हॅंड्‌स असोसिएशन' नावाने गिरणी कामगारांची संघटना स्थापना केली. भारतातील संघटित कामगार चळवळीची ही सुरवात होय.

23 September in History Dinvishesh
22 September in History : राजकीय तडजोडींपायी होणारी घुसमट; दहा वर्षांपूर्वीही हेच होते चित्र

1908 : हिंदीतील कवी व लेखक, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते रामधारी सिंह "दिनकर' यांचा जन्म. भागलपूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. केंद्रीय गृहमंत्रालयाचे ते हिंदी भाषाविषयक सल्लागार होते.

23 September in History Dinvishesh
21 September in History : दहा वर्षांपूर्वीही युती-आघाडीचं घोडं अडलं होतं जागावाटपावरच; आजही तीच स्थिती

1950 : गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रात उल्लेखनीय वैद्यकीय सेवाकार्य करणारे डॉ. अभय बंग यांचा जन्म. त्यांना "महाराष्ट्र भूषण' पुरस्काराने गौरविण्यात आले.

भारतीय संसद सदस्य संघटनेतर्फे "सत्पाल मित्तल स्मृती पुरस्कार' डॉ. बंग यांच्या "सर्च' या संस्थेला मिळाला. "सर्च' या स्वयंसेवी संस्थेने नवजात मुलांचे आरोग्य या विषयावर आजपर्यंत जे सखोल संशोधन आणि प्रयोग केले आहेत त्याचा सन्मान जागतिक पातळीवर विशेषांक काढून करण्यात आला. "नेचर' या जगप्रसिद्ध प्रकाशनाने "निओनेट्‌स इन गडचिरोली' या नावाने विशेषांक काढून "ग्लोबल हेल्थ कौन्सिल'च्या जागतिक संमेलनात उपलब्ध करून दिला.

1992 : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस इंद्रजित गुप्ता "उत्कृष्ट संसदपटू'साठीचा "गोविंद वल्लभ पंत पुरस्कार' पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्या हस्ते प्रदान.

2009 : भारतीय अवकाश कार्यक्रमाला यशाचीच नवनवी शिखरे दाखविणाऱ्या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाने (पीएसएलव्ही) सतीश धवन अवकाश केंद्राच्या पहिल्या ‘लॉँच पॅड’वरून सलग पंधरावे उड्डाण यशस्वी करत ‘ओशनसॅट २’सह सहा ‘नॅनोसॅटेलाइट’ला ध्रुवीय सूर्यस्थिर कक्षेत नेऊन ठेवले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com