Dinvishesh 25 September Sarkarnama
विशेष

25 September in History : महायुतीतले घटक पक्षांचे जागावाटपावरुन रुसवे-फुगवे

Rashmi Mane

Political Events on 25 September : प्रत्येक राजकीय पक्षाला स्वतःची महत्त्वाकांक्षा असणे चुकीचे नाही. निवडणुका जवळ आल्या की ही महत्त्वाकांक्षा अधिकच प्रबळ होते. स्वतःच्या पदरात जास्तीत जास्त जागा पाडून घेण्याची अहमहमिका सुरु होते. त्यातून काही जण दुखावतातच.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना यांच्याह स्वाभिनानी पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, रिपब्लिकन पक्ष-आठवले गट यांची महायुती होती. त्यावेळी भाजप आणि शिवसेना या दोन बड्या पक्षांनी प्रतिष्ठेच्या जागा स्वतःच्या पदरात पाडून घेतल्या.त्यामुळे बाकीचे घटकपक्ष दुखावले गेले. त्यांनी त्यावेळी महायुतीतून पाहेर पडण्याची तयारी सुरु केली होती.

या घटकपक्षांना चुचकारण्याची कसरत त्यावेळी देवेंद्र फडणवीसांना करावी लागल्याचे. दैनिक सकाळमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीवरुन दिसते.हे नाराजी नाट्य फार काळ चालले नसावे. त्यावेळी स्वाभिमानी शेतकरी (Swabhimani Shetkari Sanghatana) संघटनेबरोबर असलेले सदाभाऊ खोत, राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर आणि रामदास आठवले आज दहा वर्षांनंतर आजच्या युतीबरोबरच आहेत.

आज महायुतीत एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde) शिवसेना भाजप बरोबर आहेच. पण त्या व्यतिरिक्त अजित पवारांच्या राष्ट्रवादीचीही त्यात भर पडली आहे. आता निवडणुकांच्या जागावाटपाबाबत आणखी चढाओढ होणार हे नक्की आहे. 'सकाळ'मध्ये २५ सप्टेंबर, २०१४ रोजी खालील वृत्त प्रसिद्ध झाल होते. आताही पुढच्या काळात अशाच बातम्या वाचायला मिळणार हे नव्याने सांगायला नको. पाहा खाली २५ सप्टेंबर,२०१४ ची बातमी.

25 September 2024 news

आजचे दिनविशेष

  • १७६८ - नेपाळचे एकीकरण

  • १९१५ - पहिल्या महायुद्धात शॅम्पेनची दुसरी लढाई सुरु झाली

  • १९१९ - रयत शिक्षण संस्थेची स्थापना

  • १९२० - इस्त्रोचे अध्यक्ष सतीश धवन यांचा जन्म

  • १९२६ - गुलामांचा व्यापार आणि गुलामगिरी मोडून काढण्यासाठीचा आंतरराष्ट्रीय करार

  • १९५५ - राॅयल जाॅर्डन हवाईदलाची स्थापना

  • १९६२ - अल्जिरियात प्रजासत्ताकाची स्थापना

  • १९६९ - ऑर्गनासझेशन ऑफ इस्लामिक को-ऑपरेशनची स्थापना

  • २००३ -जपानच्या समुद्रात ८.० रिश्टर स्केलचा भूकंप

  • २०२२ - क्बुबा मध्ये समलिंगी विवाह आणि समलिंगी दत्तक घेणे याला कायदेशीर मान्यता मिळण्यासाठी मतदान

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT